आत्महत्त्या चारोळ्या-"शेतकरी आत्महत्त्या थांबतच नाहीत,उपाय यावर सापडतच नाहीत ?"

Started by Atul Kaviraje, December 08, 2021, 01:07:55 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

     विषय  : पश्चिम  विदर्भातील  एकूण  ७७५  शेतकऱ्यांनी  गेल्या  ९  महिन्यांत  आत्महत्त्या  केल्या .
                    वास्तव -शेतकरी  आत्महत्त्या  दुःखद  चारोळ्या
       " शेतकरी  आत्महत्त्या  थांबतच  नाहीत , उपाय  यावर  सापडतच  नाहीत  ?"
--------------------------------------------------------------------------


(1)
पश्चिम  विदर्भात  जणू  पडलाय  अकाल  , अकालीच  घडताहेत  "आत्महत्त्या" 
दुजा  पर्याय  नाही , हतबल  "शेतकरी"  फास  लावून  करतोय  "स्वयं -हत्त्या"
अजूनही  सत्र  नाही  थांबलंय  पूर्णपणे , "बळीराजाचा"  जातोय  आजही  बळी ,
साऱ्या  जनतेचा  अन्नदाता  तो , त्यावरच  यावी  ही  अन्नान्न  दशा  अन  पाळी  ?

(2)
अति -वृष्टी ,अवकाळी -वृष्टी ,ढग -फुटी ,सुका  दुष्काळ ,ओला  दुष्काळ
कितीतरी  गोष्टी आहेत  कारणीभूत , "शेतकऱ्यांच्या"  या  दुरावस्थेस
पीक  आहे  तर  पाऊस  नाही ,अति -वृष्टी  झाली  तर  वाहून  जाई ,
प्रश्न  पडतोय  मनी  सर्वांच्या,  त्याच्यावरच  का  या  निसर्गाचा  कोप  होई  ?

(3)
दुबार ,तिबार  पेरणीचा  काहीही  होत  नाहीय  उपयोग
जेथे  जमीनच  झालीय  नापीक , पिके  येण्याचा  कधीच  नाहीय  योग
कर्ज  काढलंय ,ट्रॅक्टर  घेतलाय ,शेत -औजारे  घेतलीय ,सर्वच  चाललंय  वाया ,
कर्जात  बुडून , कर्जबाजारी  होऊन ,"शेतकऱ्याची" अन शेतीची केव्हाच  गेलीय  रया !

(4)
आकडा  आहे  मोठा  हताश ,हतबल,  कर्जात  बुडालेल्या  "बळीराजाचा"
९  महिन्यांत  पडलेत  आजपर्यंत  ७७५  "शेतकरी"  मृत्युमुखी ,बळी  देऊन  स्वतःचा
पश्चिम  विदर्भात  एवढा ,तर  इतर  ठिकाणची  मोजदादच  होत  नाहीय ,
आता  मरणच  जवळ  करायचे  या  परिस्थितीत , त्यांना  का  घाई  झालीय  ?

(5)
हेही  दिवस  जातील ,हीही  परिस्थिती  सुधारेल ,थोडा  धीर  धरावा
सरकारने  त्यांच्या  या  हलाखीच्या  परिस्थितीत  त्यांना  मदतीचा  हात  द्यावा
मरण  का  स्वस्त  आहे , अविचाराने , आंधळेपणाने  ते  ओढवून  घ्यावे  ?
आधारच  गेल्यावर  त्याच्या  पाठी , त्याच्या  कुटुंबाने  कोणाकडे  पहावे  ?

(6)
आता  नकोत  आणि  "आत्महत्त्या" , बस  झाले , "शेतकऱ्यांनो"  जिद्द  सोडू  नका
हिम्मत  दाखवा , असे  हताश , हतबल  होऊन  जीव  देऊ  नका
निसर्गाने  फिरवली  पाठ  म्हणून , निराश  होऊ  नका , आशावादी  रहा ,
शेवटी  माणूसच  येईल  मदतीस  माणसाच्या , नव्या  आशेत  जगत  रहा .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.12.2021-बुधवार.