"विवाहसोहळा होतोय संपन्न दिव्यांगांचा,त्यांनाही अधिकार आहे माणूसम्हणून जगण्याचI"

Started by Atul Kaviraje, December 13, 2021, 01:27:11 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय : पालघर  येथे , जागतिक  अपंग  दिनानिमित्त  दिव्यांग  वधू -वरांचा  सामुदायिक  विवाह -सोहळा  संपन्न  झाला .
           अपंग  दिनानिमित्त  दिव्यांग वधू-वरांचा  विवाह -सोहळा -चारोळ्या
                      दिव्यांग  (अपंग ) व्यक्तींचे ,वधू -वरांचे  मनोगत
"विवाह सोहळा होतोय संपन्न दिव्यांग व्यक्तींचा,त्यांनाही अधिकार आहे माणूस म्हणून  जगण्याचा"
--------------------------------------------------------------------------


(1)
निसर्गाने  काहीतरी  कमी  ठेवलंय  आमच्यात , उणीव  आहे  जन्मतःच
म्हणून  काही  आम्ही  जगणं  नाही  सोडलंय ,अंतर्भाव  आहे  जिद्दीचंIच
आम्हाला  नकोय  तुमची  दया ,सहानुभूती , नाहीय  आम्ही  अगतिक ,असहाय्य ,
जरी  नसली  तुमची  मदत  आम्हा , तो  परमेश्वरच  करील  आम्हा  साहाय्य .

(2)
तुमचा  हेटाळणीचा  सूर  थांबवा ,आम्हाला  टाळणे  थांबवा
"अपंग (दिव्यांग )"असलो  म्हणून  काय  झाले , मनाने  तर  आहोत  खंबीर
आमच्याकडेही  पहा  माणुसकीने , तुमच्या  विचित्र  नजर  जरा  थांबवा ,
आम्हालाही  आहे  जगण्याचा  हक्क ,आमचं  मन  झालंय  केव्हाच  स्थिर .

(3)
आता  हेच  आमचे  जगणे  "दिव्यत्त्वाचे ,भव्य -दिव्य" ,आम्ही  आहोत  "दिव्यांग"
लढतोय  जीवनाशी,मुकाबला  करतोय सर्वसाधारण मनुष्याप्रमाणे, विसरून सारे "व्यंग"
आम्हालाही  मिळावेत  सारे  हक्क ,सामान्याप्रमाणेच  जीवन  जगता  यावे ,
आयुष्यात  पुढे  जाण्यासाठी , कुणाचेतरी  मदतीचे  हात  पुढे  यावे .

(4)
समाजसेवी  संस्थांनी ,मानवाधिकार  समितीने , आम्हा  आमचे  मिळवून  दिलंय  स्थान
समाजाचा  एक  विशिष्ट  घटक  आहोत  आम्ही ,समाजात  राखून  मान
जागतिक  अपंग  दिनाचे  औचित्य  साधलंय  या  सेवा -भावी  संस्थांनी ,
"विवाह"  योजिलाय  आमचा , दुर्लक्ष  करून  अपंगत्त्वाकडे, मंडप सजलाय वऱ्हाडीनी .

(5)
आज  आमच्या  डोळ्यांत  अश्रू  आहेत ,एक  नवे  आयुष्य  सुरु  होत  आहे
या  जीवन -प्रवासात  साथ  देण्या , जीवन -साथीचा  हात  हाती  धरला  आहे
या  सेवाभावी  जनांचे  लाख  धन्यवाद , यांनी  आम्हा  नाही  उपेक्षिले ,
पुढील  आयुष्य  जगण्यास  "विवाह -सोहळ्यानिमित्ते", त्यांनी अभिनव  पाऊल  उचलले .

(6)
आता  आणि  आत्मबल  वाढवायचंय ,कणखर  व्हायचंय ,मनो -निग्रहच  करायचाय
खंत  उरीची  बाजूस  करून ,आमच्यासारख्याच  एकाला  सतत  जपायचंय
समाजात  आहे  अजूनही  शिल्लक  माणुसकी ,या  देवदूतांचा आशीर्वाद आहे पाठीशी ,
अग्रेसर व्हायचंय,ही कमीपणाची भावना  दूर  सारून, एक  सामान्य  जीवन  जगायचंय .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.12.2021-सोमवार.