पाणी-टंचाई चारोळ्या-"माझ्या हंड्यात नाहीय पाणी,सरकारला देताहेत निवेदन राजा-राणी"

Started by Atul Kaviraje, December 15, 2021, 01:01:05 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

 विषय : पाणी -टंचाई  विरुद्ध  पालिकेला  नागरिकांनी  पाण्याच्या  हंड्यातून  निवेदन  दिले
                           वास्तव  मार्मिक  पाणी-टंचाई चारोळ्या
           "माझ्या हंड्यात नाहीय पाणी,सरकारला देताहेत निवेदन राजा-राणी"
------------------------------------------------------------------------


(1)
आज  "पाण्याविना"  माणसात  आली  आहेत
राजा -राणीचा  संसार  करणार  ती  दोघे
"पाणी"  नाही  नळाला , कसं  जाऊ  ऑफिसला  ?
"पाण्याविना"  जीवन  अधुरे ,अपुरे , अर्थ  नाही  मम्  जीवनाला  !

(2)
पावसाने  घातलाय  धुमाकूळ  यंदा , सहस्त्र -धारांनी  बरसलाय
तलाव  भरलाय , ओढा  भरलाय , नदीला  चक्क  पूर  आलाय
धरणातून  "पाण्याचा"  अजस्त्र  लोट  गाव -गावांत  शिरलाय ,
तरी  "पाणी" -टंचाईचा  एकचं  नारा , गावा -शहरांतून  घुमलाय  !

(3)
"पाण्याचे"  नियोजन  नाही , पावसाचे  "पाणी"  वाया  जाई
साठवणीचा  सरकारकडे  तलावाविना  एकही  उपाय  नाही
अहो , आधुनिक  शास्त्राची  मदत  घ्यावी , यापुढे  "पाणी"  साठवासाठी ,
"पाणी"  टंचाईला  मात  द्यावी , पूर्व -नियोजन  असावे  यापाठी .

(4)
आज  "पाण्याचे"  सारे  हंडे , निवेदन -आवेदन  अर्जांनी  भरले  होते
रस्त्यातून  हंड्यांचे ,कलशाचे ,कळश्यांचे  जेथे  चालले  होते
"पाणी"  नाही  निदान  आमचे  निवेदन  तर  वाचा , एकचं  सुरु  होता  घोष ,
अखिल  जनता  दाखवीत  होती  सरकारवरचा  आपला  रोष .

(5)
"पाण्याच्या"  तुटवड्यासाठी  हंड्यानी  मोर्चा  काढला  होता
केव्हातरीचा  त्यांचा  थाटमाट  "पाण्यासवे"  पाहण्याजोगा  होता
"पाण्याविना"  हंडा  आज  शोभत  नव्हता , उदास  होता ,
नळाला  कधी  येतंय  पाणी , याची  तो  आतुरतेने  वाट  पाहत  होता .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.12.2021-बुधवार.