II श्री गुरु देव दत्त II-लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, December 18, 2021, 12:14:09 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       II श्री गुरु देव दत्त II
                                            लेख क्रमांक-१
                                     ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१८.१२.२०२१-शनिवार आहे. आज माझ्या श्री दत्त गुरूंची जयंती आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व  बंधू -भगिनी  कवी -कवयित्री याना श्री दत्त जयंतीच्या मनापासून शुभेच्छा. या शुभ पर्वावर वाचूया या दिनाचे महत्त्व, माहिती, लेख, शुभेच्छा आणि इतर माहिती.

                             दत्त जयंती  २०२१---
                           ------------------

     मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केली जाते . दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री दत्तजयंती १८ डिसेंबर या दिवशी साजरी केली जाणार आहे .

                  दत्त जयंती कशी साजरी करावी---
                -----------------------------

     दत्त जयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. भजन, पूजन आणि विशेषकरून कीर्तन वगैरे भक्तीचे प्रकार प्रचारात आहेत. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असते. तामिळनाडूमध्येही दत्त जयंतीची प्रथा आहे. दत्त जयंती या दिवशी काही ठिकाणी दत्तयाग केला जातो.

     स्त्रियांनी नऊवारी साडी अन् पुरुषांनी सदरा-धोतर/पायजमा अशी सात्त्विक वस्त्रे परिधान करून उत्सवात सहभागी व्हावे. विद्यार्थ्यांसाठी 'श्रीदत्तात्रेयकवच' पठण ठेवावे, दत्ताचा नामजप करवून घ्यावा. उत्सवाच्या ठिकाणी कर्णकर्कश संगीत लावणे, विद्युत रोषणाईचा झगमगाट यांसारख्या रज-तम निर्माण करणार्‍या कृती करू नयेत. दत्त जयंतीच्या मिरवणुकीत टाळ, मृदुंग अशी सात्त्विक वाद्ये वापरावीत.


                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-आय टेक मराठी.कॉम)
                  ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.12.2021-शनिवार.