म्हणी-"गाढवाला गुळाची चव काय?"

Started by Atul Kaviraje, December 19, 2021, 08:05:56 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "गाढवाला गुळाची चव काय?"

                                           म्हणी
                                        क्रमांक-93
                                "गाढवाला गुळाची चव काय?"
                               ----------------------------

93. गाढवाला गुळाची चव काय?
     -------------------------

--मुर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.
--ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही.
--मूर्ख माणसाला चांगल्या गोष्टींची किंमत नसते.
--मूर्ख माणसाला ज्ञानाचे महत्व माहित नसते.
-- मूर्ख माणसाला चांगल्या गोष्टीचे महत्त्व कळत नाही.
--अडIण्याला चांगल्या गोष्टींचे मोल कळत नाही.
--वाक्य वापर : पोटात भूक असणाऱ्याला उपदेश करुन गाढवाला गुळाची चव देण्यात काही अर्थ नसतो.
--मूर्ख मनुष्यास चांगल्या गुणांची पारख नसते.
--मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार-गाढवाला गुळाची गोडी त्‍याच्या तृणखाद्याहून विशेष अशी नसणार. त्‍याला गवत व गूळ सारखेच. अतज्‍ज्ञ, मूर्ख, गाजरपारखी माणसाच्या हाती चांगल्‍या, सुंदर गोष्‍टी देण्याने त्‍याचे मुळीच चीज होत नाही. -''पण, 'गाढवास गुळाची चव काय?' ह्याप्रमाणेंच स्‍थिति होऊन त्‍याला फुकट शीणावांचून काही एक लभ्‍यांश होत नसे.'' -छच १२९. (गु.) गद्धा क्‍या जाणे जाफरानकी बात?
कोंबड्यापुढे मोती. ज्‍याला एखाद्या गोष्‍टीचा काही उपयोग नाही त्‍याला ती गोष्‍ट देणें.

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                   --------------------------------------------

                        गाढवाला गुळाची चव काय?(ब्लॉग)---
                      --------------------------------

     भरपूर दिवसांपासून इच्छा होती की मराठीत एक ब्लॉग लिहावा. टी इच्छा अत पूर्ण होते आहे तय मुले मी थोडा खुश आहे पण अता प्रश्न असा आहे की के लिहावे? थोडा विचार केल्यावर लक्ष्यात आले की कोणत्याही म्हणिवर आपण लिहू शकतो, पण मग प्रश्न असा पडल की कोणती म्हण?

     आता म्हणी तर भरपूर आहेत पण म्हण अशी हवी जी आपण रोज रोज भरपूर वेळा वापरतो.. अशी एक मला आवडणारी म्हण म्हणजे गाढवाला गुळाची चव काय?
मला हि म्हण आवडते कारण मी हि कुठेही वापरू शकतो. तसे बघायला गेले तर या म्हणीला काही विशेष अर्थ नाही याचा अर्थ एवढाच कि एखादी चांगली गोष्ट ज्याला काहीही काळात नाही त्याला चांगली वाटेलाच असे नाही. पण माणसाला विचार करायची जिओ शक्ती देवाने दिली आहे त्याचा उपयोग एखाद्या हत्यारासारखा आपण करू शकतो.

     जी माझे मित्र माझ्याबरोबर बरेच वेळा असतात त्यांना आत्तापर्यंत कळले असेल कि मी कश्यावर बोलतो आहे. :) मी हि म्हण अगदी कुठे हि वापरतो, जी गोष्ट मला आवडत नाही त्याच्याशी कोणीही थोडीही फारकत घेतली कि माझे उत्तर हमखास ठरलेले असते , "गाढवाला गुळाची चव काय?" मग ती गोष्ट कोणतीही असुदे, आवडलेला चित्रपट, आवडलेले गाणे, आवडलेला पदार्थ काहीही असुदे हि म्हण परफेक्ट फिट बसते.


                 (साभार आणि सौजन्य-संदर्भ-जोशीबुवा.ब्लॉगस्पॉट.कॉम)
                -------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.12.2021-रविवार.