"सावित्रीबाईफुलेंचा वारसा पुढे चालवतेय,लक्ष्मी मुलींच्या शिक्षणास पुढाकार घेतेय"

Started by Atul Kaviraje, December 20, 2021, 01:55:12 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय : जळगाव  येथे  श्री. शिवदास  मोरे  यांची  कन्या लक्ष्मी  ही  गरीब  मुला-मुलींच्या  शिक्षणासाठी  पुढाकार  घेतेय, व  त्यासाठी  तिने  राहत्या  घरीच  अंगणवाडी  सुरु  करून  त्यात  त्या  मुलांची  ती  शाळा  भरवतेय . श्री.  मोरे  हे  लाकडी  खेळणी  बनवून  आपल्या  कुटुंबाचा  उदर -निर्वाह  करतात . मागील  कोरोनाच्या  काळात  शाळा  बंद  पडल्यामुळे , लक्ष्मीने  हे  अभिनव  पाऊल  उचलले  आहे . स्वतः  एका  छोटाश्या  झोपडीत  राहून , व  इयत्ता  ९- वीत  शिक्षण  घेऊन , ही  आधुनिक  सावित्री , या  बाल -वयातच  या  गरीब  मुलांच्या  भविष्यासाठी  खटपट  करतेय , स्वखर्चाने  ती  त्यांना  या  अंगणवाडीत  शिकवतेय .
             लक्ष्मीच्या  रूपातील  आधुनिक  सावित्रीबाई  फुले -प्रेरणादायी  चारोळ्या
   "सावित्रीबाई फुलेंचा वारसा पुढे चालवतेय,लक्ष्मी मुलींच्या शिक्षणास पुढाकार  घेतेय"
--------------------------------------------------------------------------

(1)
पावलांवर  पाऊल  ठेवून  चालतेय  ही  लहानगी  "लक्ष्मी",  "सावित्रीबाई  फुलेंच्या"
आठवणींना  उजाळा  देत ,  महान  कार्य  घडतंय  हातून  या  बालवयात  तिच्या
स्वतः  असून  मुलगी ,इतर  मुलींची  ती  "अंगणवाडी"  भरवतेय , "शाळा"  घेतेय ,
गरिबांची  "सावित्री"  होऊन  ती , त्यांना  घडवतेय ,त्यांची  ताई -आई  होतेय .

(2)
जळगावातील  गरीब  वस्तीत ,झोपडीत  राहतात  श्री.शिवदास  मोरे
लाकडी  खेळणी  बनवून ,विकून  उदर -निर्वाह  करतात  आपल्या  कुटुंबाचे  सारे
"लक्ष्मी"  एकुलती  एक  कन्या  त्यांच्या  आलीय  पोटी ,त्याचे  पांग  फेडतेय ,
वडिलांना  त्यांच्या  कार्यात  ती  हातभार  लावतेय , त्यांना  मदत  करतेय .

(3)
कोरोनाचा  कहर  अजुनी  आहे  सर्वत्र , जायचे  नाव  घेत  नाही
गरीब  कुटुंबातील  मुले  ही , त्यांचे  शिक्षण  कोणी  पहात  नाही
"लक्ष्मी"  आलीय  पुढे , त्यांचा  घेऊन  कैवार ,झोपडीत सुरु केलीय तिने "अंगणवाडी" ,
भरून  गेलीय  मुला -मुलींनी , वह्या -पुस्तकांनी ,पाट्या -फळ्यांनी  तिची  झोपडी .

(4)
स्वतः  शिकून  ९ -वी  इयत्तेत , ती  गरीब  मुलांचीही  घेतेय  "शाळा"
गजबजतेय  ही  मुलांची "अंगणवाडी",आहे  उत्साही,सकाळ -संध्याकाळ , दोन्ही  वेळा
काळजी  आहे  "लक्ष्मीस"  या  गरिबांची , शिक्षणाचे  महत्त्व  तिला  कळून  चुकलेय ,
"शाळा"  बंद ,खेळ  बंद ,वाया  जाईल  मुलांचे  भविष्य  हे  तिने  जाणलेय .

(5)
ही  आधुनिक  "सावित्री" , त्या  "सावित्रीबाई  फुलेंचा"  वारसा जपतेय, चालवतेय  पुढे
वंदन  या  मानिनीस, तिच्या  दृढ -निश्चयास , या  वयातही  ती  काही  करून दाखवतेय
आज  साऱ्या  गरीब  वस्तीस  तिचा  अभिमान  आहे ,गर्व  आहे ,आपुलकी  आहे ,
अधिकाधिक  गरीब  मुले -मुली  या  "अंगणवाडी  शाळेत"  दाखल  होताहेत .

(6)
शिवदास  मोरे  धन्य  आहेत ,ऐश्या  पुत्रीस , "लक्ष्मीस"  जन्म  देऊन
जे  भल्या  भल्या  सुशिक्षितांनाही  नाही  जमले , ते  तिने  करून  दाखवलेय
पदरमोड  करून  ती  या  मुलांना  शिक्षण  देतेय ,त्यांची  सारी जबाबदारी  ऊचललीय ,
मानाचा मुजरा माझा  या "सावित्रीस", तिने हे समाज-कार्याचे अभिनव पाऊल उचललेय .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.12.2021-सोमवार.