चारोळ्या- "तुम्हा दोघांत आम्ही भरडले जातोय,आमच्या शिक्षणाचा विचारच कोण करतोय?"

Started by Atul Kaviraje, December 21, 2021, 01:41:29 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

  विषय : कोल्हापूर  येथे , ST सेवा  सुरु  करण्यासाठी  विद्यार्थी  आंदोलनासाठी  रस्त्यावर  उतरलेत .
                 ST संपामुळे  विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक  नुकसान -चारोळ्या
     "तुम्हा दोघांत आम्ही भरडले जातोय,आमच्या शिक्षणाचा विचारच कोण करतोय?"
-------------------------------------------------------------------------


(1)
सरकार  व  संपकरी  ST कर्मचारी , आपापल्या  मतास  आहेत  चिकटून
संप  काही  हटत नाही ,सरकार  काही  बधत  नाही ,पावले  आहेत  घट्ट  रुतून
कळत -नकळत  सामान्य  जनतेचे  यामुळे  होतंय  नुकसान ,फटका  बसतोय ,
त्याहीपेक्षा  गंभीर  परिस्थितीतून , हा  गावचा  गरीब  "विद्यार्थी"  भरडला  जातोय .

(2)
वेळेवर  "परीक्षेस"  बसता  येत  नाही ,ST शिवाय  दुसरे  प्रवासी  वाहन  नाही
दुर्गम  भागातूनही  गंतव्य  स्थानी पोचवणारी  ही  लाल  परी  रुसून  राही
हाल "विद्यार्थ्यांचे",नाही दिली"परीक्षा",तर वर्ष वाया जाणार,त्याच वर्गात बसावे लागणार ,
खाजगी  वाहनांतून  जाता  अधिभार ,अधिक  भाडे ,द्यावे  लागणार .

(3)
गावागावांतील  गरीब  "विद्यार्थ्यांचे"  या  संपामुळे  भविष्य  अंधारमय  आहे
त्यांची  पुढील  आयुष्याची  प्रकाशमय  वाटचाल ,काळोखाचे  रूप  घेत  आहे
"परीक्षा"  नाही  तर नोकरी  नाही, नोकरी  नाही  तर  पुढची  कल्पनाच  करवत  नाही ,
द्विगुणित  असणारा  हा  त्यांचा  "परीक्षा" -उत्साह ,हळूहळू  ओसरतंच  जाई .

(4)
आज  या  संतप्त  "विद्यार्थ्यांनाही"  रस्त्यावर  उतरावे  यामुळे  भाग  पडतेय
या  वयातही  त्यांना  आंदोलनाचे  अस्त्र , नाईलाजाने  उगारावे  लागतेय
संपकरी  ST कर्मचारी  आणि  सरकारमध्ये  आम्ही  उगा  का  भरडावे  ?
रोख -ठोक  सवाल  हे  बाल -वयातील  "विद्यार्थी" , सरकारला  विचारू  लागलेत .

(5)
कोल्हापूर  येथे  चाललेले  "विद्यार्थी"  आंदोलन ,हळूहळू  सगळीकडे  पसरेल
तीव्र  ठिणगी  पडून ,हा  आंदोलन -वणवा ,सर्वत्र  पसरेल ,सारेच  भसम  करेल
"विद्यार्थी"  युवा -शक्तीपुढे ,आजच्या तरुणाईपुढे , सर्वच  स्वाहा  होईल ,खाक  होईल ,
वेळीच  सावरावे  सरकारने ,विचार  व्हावा  गांभीर्याने ,होत्याचे  नव्हतेच  होईल .

(6)
या  वयातही  "विद्यार्थ्यांना"  त्यांचे  भविष्य  दिसतंय , ते  बाल -वयातही  सुजाण  झालेत
"शिक्षणाशिवाय"  नाही  दुसरा  पर्याय , आपल्या  वक्तव्यास  ते  दृढ  राहिलेत
तेव्हा या अडेलतट्टू ,आडमुठ्या  सरकारने व  ST कर्मचाऱ्यांनी आपापले हट्ट सोडावेत ,
या "विद्यार्थ्यांची" शिकण्याची इच्छा,त्यांची जिज्ञासा, यातून तरी त्यांनी थोडे बोध  घ्यावेत .

(7)
या  "विध्यार्थ्यांच्या"  भविष्याचा  विचार  व्हावा ,सरकारने  त्वरित  यावर  निर्णय  घ्यावा
सरकार  व  ST कर्मचाऱ्यांनी एक-एक पाऊल मागे होऊन ,तहाचा सुवर्ण-मध्य  गाठावा
आजचा"विद्यार्थी"हा उद्याचा सुजाण नागरिक,देशाचे भविष्यच हा दृष्टिकोन डोळ्यांपुढे  ठेवून ,
त्वरित हा जाचक संप,कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य करून,सरकारने कायमचा हटवावा .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.12.2021-मंगळवार.