शाळा चारोळ्या-"स्वागत होतंय,औक्षण होतंय,पताका-तोरणांनी मुला-मुलींचा वर्ग सजतोय"

Started by Atul Kaviraje, December 22, 2021, 01:59:25 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

    विषय : मुंबई ,ठाणे  येथे  विद्यार्थ्यांचे  डोक्यावर  फुले  वाहून ,औक्षण  करून ,सांताक्लॉजसह ,बँड  पथकाच्या  ढोल -ताशा  गजरात ,अंगावर  फुले  उधळत , शाळेत  जंगी , मोठ्या  उत्साहात  स्वागत  झाले .
          मुला-मुलींचे  शाळेत  पुनरागमन -चैतन्यपूर्ण ,प्रेरणादायी -चारोळ्या
      "स्वागत होतंय,औक्षण होतंय,पताका-तोरणांनी मुला-मुलींचा वर्ग सजतोय"
--------------------------------------------------------------------------


(1)
तब्बल  दीड -दोन  वर्षांनी  आज  पर्वणी  चालून  आलीय ,उत्सव  सुरु  आहे
मुलंIमुलींचे"शाळेत"पुनरागमन होतंय,"शाळा"त्यांच्या स्वागता दोनपाऊले पुढे आली आहे   
वर्ग  सजलाय ,पताका  लावल्यात ,तोरणे  लावलीत ,जणू  सणच  साजरा  होतोय ,
"शाळेचे"  पटांगण  जीवाचे  कान करून , मुलांचा  आवाज  ऐकण्यास  उत्सुक  आहे .

(2)
"शाळा" भरतेय ,घंटा  वाजतेय ,वर्गात  मुलंI -मुलींचा  अभ्यास ,खोड्या  सुरु  झाल्यात
"शाळेस"पुन्हा जीवनदान मिळालंय ,मावळलेल्या  तिच्या  साऱ्या  आशा  जिवंत  झाल्यात
गेलेली  "शाळेची"  रया ,उदास ,भकास  वातावरण  पुन्हा  एकदा  चैतन्यमय  झालंय ,
हसण्या-खिदळण्याने,आरडा-ओरड्याने,मूलIमुलींचा हरवलेला आवाज पुनरपि गवसलाय. 

(3)
औक्षण होतंय,डोईवर फुले पडताहेत,माथी तिलक होतोय,अंगावर फुलांची उधळण होतेय   
ढोल  वाजविण्या  बँड  पथक  सुसज्ज  होतंय ,सांताक्लॉजचीही  एंट्री  होतेय
चौकलेट  वाटप  होतंय ,मिठाईचे  वाटप  होतंय ,गुलाब -पुष्पे  दिली  जाताहेत ,
एक सळसळता उत्साह,उमंग,उमेद या मूलI-मुलींच्या रूपे साऱ्या"शाळाभर"वाहत आहे.

(4)
मूलI-मुलींना पुन्हा त्यांचे सवंगडी  गवसलेत ,त्यांच्या  खोड्या -मस्कऱ्यांना  ऊत  आलाय
कोरोनाकाळी डांबून ठेवलेल्या त्यांना  आज  काय  करू  नी  काय  नको , असं  झालंय
पंख फुटल्यागत ती उडताहेत,अस्मानात विहरताहेत ,आनंद  गगनी  मावेनासा  झालायं ,
त्यांचे ते हरवलेले दिवस ,ते पुन्हा पहाताहेत,खाण्या-पिण्याचाही चक्क  विसर  पडलाय .

(5)
जमलेल्या  कोळिष्टकांना  बाजूस  सारीत ,वर्गातील  फळा  त्यांची  वाट  पहातोय
वह्या -पुस्तकांनी  पुन्हा  बाके  सजलीत ,वर्गात  उत्साहाचे  पडसाद  उमटताहेत
या  बाळांचे  चिमणे  बोल  ऐकण्या , "शाळेच्या"  भिंतीही  कान  टवकारून  आहेत ,
तो  रसरशीत  जिवंतपणा ,तो  सळसळता  उत्साह ,सारीकडे  भरून  वाहत  आहे .

(6)
आज  मूलI-मुलींचे  एक नवे जीवन सुरु  होत  आहे ,भविष्याची  पुन्हा  वाटचाल  होतेय
मुंबई ,ठाणे  साऱ्या  महाराष्ट्रभर ,"शाळांत"  घंटानाद  होऊन  शिक्षणाची  नांदी  होतेय
एकसुरात,खड्या स्वरातील या  बाल-चमूंचा  प्रार्थना  आवाज  "शाळाभर"  दुमदुमतोय ,
या मूलI -मुलींच्या आई -वडिलांच्या डोळ्यातील अश्रू-थेम्ब त्यांचा आनंद सांगून जातोय .



-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.12.2021-बुधवार.