संप दुखवटा चारोळ्या- "संपाचे नवीन नाव दुखवटा,धारण केलाय का त्यांनी मुखवटा ?"

Started by Atul Kaviraje, December 24, 2021, 01:51:07 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय : ST कर्मचाऱ्यांच्या  संपाला ,आंदोलनाला  आता  जवळ -जवळ  2 महिने  उलटून  गेलेत . सरकार  तहाची  बोलणी  करण्यास  तयार  आहे . काहीतरी  सुवर्ण -मध्य  गाठूया  असे  सरकार  म्हणतेय . तेव्हा  संप  आता  संपल्यात ,मिटल्यात  जमा  आहे  असे  वाटू  लागलंय . परंतु  थोडीशी  धुगधुगी  अजूनही  शिल्लक  आहे . आता  संपाचे  दुखवटा  असे  नवीन  नामकरण  झाले  आहे . संप  अजूनही  सुरूच  आहे .पाहूया  पुढे  काय  होते  ते  !
                      संप  संपून  दुखवटा  सुरु - ? -चारोळ्या
           "संपाचे नवीन नाव दुखवटा,धारण केलाय का त्यांनी मुखवटा ?"
--------------------------------------------------------------------------


(1)
ST  "संप"  संपल्याचे  जाहीर  झाले , सगळीकडे  आनंदाचे  वातावरण  पसरले
पण  ही  केवळ  होती  अफवाच,  माहित  नव्हते , खोटे  किती  अन  किती  भले  ?
काही  ST कर्मचारी  रुजू  झालेत  कामावर ,काहींनी  "संप"  अजुनी  सुरु  ठेवलाय ,
द्विधा  मनःस्थितीच्या  ST कर्मचाऱ्यांना , इकडे  आड  तिकडे  विहीर  झालीय .

(2)
वेतन -वाढ ,बडतर्फी ,निलंबन ,नोकर -सरतीचे  मेमो ,सरकारचे  सारे  उपाय  थकलेत
कारणे  दाखवा  नोटिसांचे , बदली  पत्रांचेही  तुकडे -तुकडे  झालेत, ते स्वाहा झालेत 
विलीनीकरणावर  ठाम  अडून  होते  ST कर्मचारी , म्हणती  घेऊनच  दाखवणार ,
घेणार  आणि  घेणार ,घेतल्याशिवाय  स्वस्थ  नाही  राहाणार ,गप्प  नाही  बसणार  !

(3)
वकील  गुणरत्न  सदावर्ते ,सरकारच्या  नाकर्तेपणावर  खेद   व्यक्त  करताहेत
सारी  आमिषे  दाखवून  झालीत  संपकरीनI, आता  नवीन  काय  ते  विचारताहेत
खेळ -खंडोबाचं  झालाय  सारा , मांजर -उंदरांचा  लपाछपीचा  खेळ  सुरु  आहे ,
कधी  उंदीर  लपतोय ,समोर  येतोय ,मांजर  पकडतेय ,पुन्हा  उंदीर  लपत  आहे .

(4)
आता  तर  सारे  संपकरी  म्हणती , हा  "संप"  नव्हे  आम्ही  पाळतोय  "दुखवटा"
दुःख  झेलून -झेलून  यांच्या  मनावर , झालाय  आघात , आलाय  फुगवटा
साराच  बोजवारा  झालाय ,कुणी  लपवतोय  चेहरा , तर  कुणी  घालतोय  मुखवटा ,
तरी  संप  सुरु  आहे  बेमुदत , कुणीही  नाही  गेलाय ओलांडून आंदोलनाचा  उंबरठा .

(5)
खंत  व्यक्त  होतेय ,आत्महत्त्या  केलेल्या ,बळी  गेलेल्या ,ST कर्मचाऱ्यांच्या  बलीदानावर
पडसाद  उमटणे  बंद  झालेय ,आंदोलनात  आता  नवीन  काही  नाही  राहिलंय
तोच -तोचपणा ,तोच -तोच  घोष ,त्याच -त्याच  घोषणा , निषेधार्थ  सरकारच्या ,
संपाचे  हे  तेव्हाचे  धारदार  अस्त्र , जणू  आता  बोथटच  होत  चाललंय .

(6)
कुणाचा  कुणाला  मेळ  नाही ,सरकार  - संपकरीत  खेळच  सुरु  राही
या  संपाचे  रूपांतर  हळू -हळू  खेद ,दुःख  व्यक्त  होत  "दुखवट्यातच"  होई
रोज  तोच -तोच  मुद्दा  जातोय  चघळला ,यावर  काहीही  तोडगा  निघत  नाही ,
या  खेळात  बुद्धिबळाच्या , शह  कोणाचा  अन  मात  कोणाला , सांगता  येत  नाही .

(7)
बाबांनो , आता  बास  करा , तुमचे  "संप"-धोरण  आणि  पर्यायाने  राजकारण
"संप"  म्हणा  किंवा  म्हणा  "दुखवटा" , तुम्हीच  पाळा  तो , काहीच  नसताना  कारण
हाल  होताहेत  जनतेचे ,विद्यार्थ्यांचे ,स्त्रिया  -मुलांचे ,वृद्धांचे  लाल -परी  विना ,
काय  तो  शेवटचा  "दुखवटा"  पाळा , आणि  ST प्रवास  करा  सुरु  देऊन  परवाना .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-24.12.2021-शुक्रवार.