II हैप्पी क्रिसमस-मेरी क्रिसमस II-कविता क्रमांक-10

Started by Atul Kaviraje, December 25, 2021, 03:35:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                               II हैप्पी क्रिसमस-मेरी क्रिसमस II
                                        कविता क्रमांक-10
                              --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२५.१२.२०२१-शनिवार आहे. प्रभू येशू यांचा जन्म दिवस. हा शुभ दिन,सण  नाताळ, किंवा ख्रिसमस या नावानेही साजरा केला जातो. मराठी कवितेतील माझ्या सर्व ख्रिस्ती बंधू-भगिनी कवी-कवयित्रीस नाताळाच्या  माझ्या  हार्दिक शुभेच्छा. "मेरी ख्रिसमस - शुभ नाताळ", "हैप्पी क्रिसमस-मेरी क्रिसमस". ऐकुया , नाताळाच्या काही कविता आणी गाणी.

                          नाताळ कविता क्रमांक-10---

                    कोणी नसे कुणाचा बंधु सखा रे आपुला---


कोणी नसे कुणाचा, बंधु सखा रे आपुला

1.
कैसा करू भरोसा या आप्त मंडळीचा,
सर्व सुखाचे साथी कोनी नसे कुणाचा,
येताच संकटे ही सोडीती साथ आपुला
खोटे हे सर्व नाते प्रभु एकलाची आपुला
कोणी नसे कुणाचा.........

2.
घम हा तुझा रे जीवा आला कसा कळेना,
परके हे सारे वेड्या मन के आपुले जाला,
आभास हा सुखाचा निर्माण तूच केला
खोटे हे सर्व नाते प्रभु एकलाची आपुला
कोणी नसे कुणाचा .........

3.
चल रे जीवा तु आता दोघे मिळूनी जाऊ,
ना सोबती ना साथी आई ना बाप भाऊ,
सुख दुख आयुष्याचे कंठवायाचे तुझला
खोटे हे सर्व नाते प्रभु एकलाची आपुला
कोणी नसे कुणाचा........

4.
देवा मला दे आता, तव हात आसर्याचा,
सोडू नको तू मझला, आधार तूच माझा,
तू घातले सजन मी लावी आता तिरला
खोटे हे सर्व नाते प्रभु एकलाची आपुला
कोणी नसे कुणाचा........


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-येशुकीमहिमा.इन)
                   -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.12.2021-शनिवार.