म्हणी-"गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ"

Started by Atul Kaviraje, December 25, 2021, 06:01:44 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे -  "गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ"

                                             म्हणी
                                          क्रमांक-94
                              "गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ"
                             --------------------------------


94. गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ
    ------------------------------

--मूर्ख लोक एकत्र आल्यावर मूर्खपणाचेच कृत्य करणार.
--मूर्ख लोक एकत्र जमले तर भांडणाशिवाय काहीच निष्पन्न होणार नाही.
--बिनडोक माणसांच्या गोंधळात एकमेकांवर आरोप करण्यात वेळ जातो.
--मूर्ख मनुष्य आपल्या वागण्याने सर्वदूर गोंधळ उडवतो.
--मूर्खांच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ जातो.
--गाढवे एकत्र जमली म्‍हणजे एकमेकांस लाथा देतात. त्‍यांच्या जमण्यापासून चांगली गोष्‍ट काही होत नसते. यावरून मूर्ख, क्षुद्र माणसांकडून चांगली कामे कधीहि होत नाहीत. ते परस्‍परांना व दुसर्‍यांना शिवीगाळच करणार व नांवे ठेवणार. (गु.) गधेडांनो विवाह, ते पाटुऐ रलीआत.
--वाक्य वापर : आंदोलनाची ठिकाणे म्हणजे अनेकदा गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ बनतो.

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                 --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.12.2021-शनिवार.