चारोळ्या-"ओमिक्रोनचा अंतिम डबा लांबवर दिसतोय,कोरोनाचा अग्नी-रथ धूसर होत जातोय"

Started by Atul Kaviraje, December 26, 2021, 02:03:14 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय : कोरोनाचा  नवा  व्हेरिएंट (प्रकार) ओमिक्रोन  आतासा   जोर  धरू  लागला  आहे . पूर्वीच्या  अनेक  प्रकारांच्या  तुलनेत , हा  विषाणू  कित्येक  अधिक  पटींनी  जगभर  पसरत  आहे . कोरोनाच्या  सर्व  विषाणूंना  तुल्यबळ  ठरलेला  हा  प्रकार , जितक्या  वेगाने  पसरतोय , तितकाच  तो  सौम्यही  असल्याचे  जगभरच्या  शास्त्रज्ञानी  आपले  मत  व्यक्त  केले  आहे . घशामध्ये  हलकासा  खवखवपणा , आणि  सर्दी , पडसे  असलेली  याची  लक्षणे  आहेत . जर  का  आपण  लशींचे  दोन्ही  डोस  घेतलेले  असतील , तर  या  ओमिक्रोनची  भीती  बाळगण्याचे  कारण  नाही . त्यासाठी  हॉस्पिटलमध्ये  ऍडमिट  होण्याची  गरज  नाही , घरच्या  घरी  आपण  त्यावर  औषधोपचार  करून ,क्वारंटाईन  होऊन ,आणि  कोरोना  बचावाची  त्रिसूत्री  पळून ,या  विषाणूवर  मात  करू  शकतो . त्यावर  काबू  मिळवू  शकतो .पण  गाफील  राहून  चालणार  नाही . सदैव  काळजी  घेणे  अति -आवश्यक  आहे .
    वास्तव  कोरोनाचा  अत्याधुनिक  पण  अति -सौम्य  प्रकार -ओमिक्रोन -चारोळ्या
   "ओमिक्रोनचा अंतिम डबा लांबवर दिसतोय,कोरोनाचा अग्नी-रथ धूसर होत जातोय"
--------------------------------------------------------------------------


(1)
काहीतरी  नक्कीच  घडतंय  आतासे , बहुतेक  सुवार्ता , शुभ -समाचार  कानी  पडेल
गेली  दोन  वर्षे  जगभर  विळखा  मारून  बसलेला "कोरोना", विषारी फुत्कार थांबवेल
खरी आहे ही  बातमी ,कहर  कमी  होतोय "कोरोनाचा", त्याची आच  मंदावली  आहे ,
"ओमिक्रोनच्या"रूपे ,नवीन प्रकारातील या विषाणूने,त्याची अंतिम घटकI भरवली आहे .

(2)
सळो की पळो  करून  सोडले  होते ,या "कोरोना"-रुपी राक्षसाने,गिळत चालला  होता
इलाज  नव्हता  सापडत  त्यावर ,प्रत्येकजण  नुसता  हवालदिल  झाला  होता
लस शोधली ,लशीकरण झाले ,मनुष्याला  नवं -आयुष्य  मिळाले ,मरण  दूरवर  राहिले ,
थैमान घातलेला हा"कोरोना"हळू-हळू आटोक्यात येऊ लागला,त्याचा विस्तार आक्रसत  होता .

(3)
कित्येक कुटुंबे झाली उद्ध्वस्त ,शोक -कळI  पसरली ,माणसाची  मतीच  कुंठीत  झाली
आपले  जवळचे  कुणी  गमावूनही ,त्याने  हाय  नाही  खाल्ली , जिद्द  नाही  सोडली
पुन्हा  तो उभा  राहिला, एकीच्या एका अतूट  शृंखलेत त्याने "कोरोनास"जखडून टाकले ,
जे  होते  गमावले ,ते  त्याने  एकीच्या  संघर्षाने  पुन्हा  नव्याने  उभारले, पुन्हा मिळवले .

(4)
औषधे  निघाली ,परिणामकारक  लस  शोधली ,मनुष्याची  प्रतिकार -शक्ती  वाढली
स्व -कर्तृत्त्वाने ,जिद्दीने ,अथक अहो-रात्र कष्टाने , त्याने  बलाढ्य  राक्षसावर  मात  केली
अशातच दैवाने कौल दिला, देवाची कृपा-दृष्टी झाली ,"कोरोनाचा"  कहर  कमी  झाला ,
"कोरोनाच्या"  अनेक  विषाणूंबरोबर  लढा  देऊन  आता  मानव  इथपर्यंत  पोहोचला .

(5)
पण  "कोरोना"  काही  हार  मानत  नाही ,एक  नवा  प्रकार  आतासा  उदयास  आलाय
नाम  त्याचे  "ओमिक्रोन" ,त्याने  जगभर  पुन्हा  बऱ्यापैकी  धुमाकूळ  घातलाय
पण  त्याने  पत्करले  नरमाईचे  धोरण ,फक्त  लहानसाच  झटका  त्याने  दिलाय ,
लक्षणे आहेत त्याची अति-सौम्य,हॉस्पिटल नको,ICU नको,मृत्यूचे भय तर दूरच राहिलय

(6)
पसरतोय  तो  वेगाने ,आपला  गुणधर्म  तो  दाखवतोय ,ग्रासत  सर्वांगाने ,सर्वार्थाने
पण  आता  नाही  भीती  त्यास , जो  आहे  सुरक्षित ,औषधोपचाराने  अन  लशीकरणाने
मनुष्याची वाढतेय प्रतिकार-शक्ती , एका  नवीन  आयुष्याकडे  त्याची  वाटचाल  होतेय ,
मंदावलेला त्याचा विकास ,आता  वेग  धरू  लागलाय ,जीवन  सुरळीत  पूर्ववत  होतेय .

(7)
"कोरोना"  पँडेमिकचे  रूपांतर , हळू -हळू  एंडेमिकमध्ये  होऊ  लागलंय
तरीही राहील तो आपल्याबरोबर , साथ  देईल  आपणास ,आयुष्यभर  सौम्य  लक्षणांसह
पण तोवर आपणच आपली काळजी घ्यावी,"कोरोना"त्रिसूत्री नियमांचे कायम पालन  करून ,
जीवन  एकदाच  मिळते ,ते  जपावे ,त्याचे  सदैव  रक्षण  व्हावे , कसेही  करून .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.12.2021-रविवार.