" भीमराया ईथे निजला "

Started by Ashok_rokade24, December 29, 2021, 03:57:49 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

ओढ दर्शनाची समाज सारा लोटला ,
सागर किनारी ह्या भीमराया निजला ॥

भूक विसरला पोटाची
शमविली भूक ज्ञानाची
ऊद्धरीता समाज सारा
भीमराया अति शिनला
सागर किनारी ह्या भीमराया निजला ॥

अन्यायाची ही गती वाढली
माणूसकी हरवून गेली
न्याय हक्क समानते साठी
सदैव लढतच राहीला
सागर किनारी ह्या भीमराया निजला ॥

झीजवूनआपली काया
झाला दीन दलितांची छाया
ज्ञानाची पेटवून मशाल
मार्ग हा मुक्तीचा दाखविला
सागर किनारी ह्या भीमराया निजला ॥

ज्ञान संघटन संघर्षाचा
मंत्र असा दिला प्रगतीचा
मार्ग शांतीचा धम्म बुद्धांचा
भीमरायां मुळे ऊमजला
सागर किनारी ह्या भीमराया निजला ॥

युग पुरूष तो धुरंधर
आला जन्मा या धरणीवर
दीपस्तंभ हा युगा युगाचा
करू वंदन महामानवाला
सागर किनारी ह्या भीमराया निजला ॥

अशोक मु. रोकडे .
मुंबई .