"३१-डिसेंबर – दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, December 31, 2021, 10:52:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-३१.१२.२०२१-शुक्रवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                   "३१-डिसेंबर – दिनविशेष"
                                  ------------------------


अ) ३१ डिसेंबर रोजी झालेल्या घटना.
   -----------------------------

१६००: ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना.

१८०२: इंग्रज व दुसरा बाजीराव यांच्यात वसईचा तह झाला या तहात पेशव्यांचा बराच भूभाग इंग्रजांच्या अधिपत्याखाली गेला.

१८७९: थॉमस एडिसनने मेन्लो पार्क, न्यू जर्सी येथे प्रथमच विद्युत दिव्यांचे प्रात्यक्षिक दाखवले.

१९४४: दुसरे महायुद्ध – हंगेरीने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

१९५५: जनरल मोटर्स वर्षातून 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई करणारी पहिली अमेरिकी कंपनी बनली.

१९८५: युनायटेड किंग्डम ने युनेस्कोचे सदस्य बनले.

१९९९: बोरिस येल्त्सिन यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

१९९९: पनामा कालव्यावर पनामा (देशा) चे पूर्ण नियंत्रण आले. त्याआधी काही वर्षे या कालव्यावर अमेरिका व पनामा यांचे संयुक्तपणे नियंत्रण होते.

२००४: त्याकाळी जगात सर्वात उंच असलेल्या (१६७० फूट), तैपेइ – १०१ या इमारतीचे उद्‍घाटन झाले.

=========================================

ब) ३१ डिसेंबर रोजी झालेले जन्म.
   ---------------------------

१८७१: आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक गजानन यशवंत ताम्हणे तथा माणिकराव यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे १९५४)

१९१०: हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९२)

१९२५: भारतीय लेखक श्री लाल शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर २०११)

१९३४: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अमीर मुहम्मद अकरम अववान यांचा जन्म.

१९३७: वेल्श अभिनेता अँथनी हॉपकिन्स यांचा जन्म.

१९४८: अमेरिकन गायिका डोना समर यांचा जन्म. (मृत्यू: १७ मे २०१२)

१९६५: भारतीय क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांचा जन्म.

=========================================

क) ३१ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू.
   ---------------------------

१९२६: इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे निधन. (जन्म: १२ जुलै १८६३)

१९५३: के.एल.एम. चे संस्थापक अल्बर्ट पेलेस्मान यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १८८९)

१९८६: केंद्रीय आरोग्य मंत्री राजनारायण यांचे निधन.

१९९३: जॉर्जियाचे पहिले अध्यक्ष झवेद गमझखुर्डिया यांचे निधन. (जन्म: ३१ मार्च १९३९)

१९९७: स्वरराज छोटा गंधर्व यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९१८)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.12.2021-शुक्रवार.