नवं-वर्ष - २०२२-लेख क्रमांक-1

Started by Atul Kaviraje, January 01, 2022, 12:03:04 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         नवं-वर्ष - २०२२
                                          लेख क्रमांक-1
                                       -----------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-३१.१२.२०२१-शुक्रवार, गतवर्षाला निरोप देऊया, आणि दिनांक-०१.०१.२०२२-दिनांक-शनिवार, नवं-वर्षाचे मनापासून स्वागत करूया. या नवं-वर्षी(२०२२), नव्या कामांची,कार्यांची यादी करूया आणि ती वर्ष-अखेर पूर्वी पूर्ण करण्याचाही मनापासून संकल्प करूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी,कवी-कवयित्री ना या नवं-वर्षाच्या (वर्ष-२०२२) च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या नवं-वर्षाचा महत्त्वाचा लेख, शुभेच्छा, सदिच्छा इत्यादी. 

Advice: ३१ डिसेंबरपूर्वी ही काम पूर्ण करा; अन्यथा अडचणीत होईल वाढ
नवं वर्ष २०२२ सुरु होण्यासाठी काही दिवसांचा अवधी उरला आहे. शेवटचा आठवडा असल्याने आपल्याला महत्त्वाची काम उरकणं गरजेचं आहे. अन्यथा नव्या वर्षात अडचणींचा सामना करावा लागेल. ईपीएफ अकाउंटमध्ये ई-नॉमिनी नमूद करण्यापासून आयटीआर फाईल दाखल करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंतचा अवधी आहे.

                    आधार UAN शी लिंक करा---

     कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सदस्यांना UAN क्रमांक आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे. UAN ला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर आहे. EPFO गुंतवणूकदारांसाठी आधार लिंक करणे अनिवार्य आहे. असे न केल्यास येत्या काही दिवसांत अडचण येऊ शकते आणि पीएफ खाते बंद होऊ शकते.

                        पेन्शनसाठी लाइफ सर्टिफिकेट जमा करा---

     तुम्हीही पेन्शनधारकांच्या श्रेणीत येत असाल, तर तुम्हाला ३१ डिसेंबरपर्यंत तुमचे लाइफ सर्टिफिकेट सादर करावे लागेल. पेन्शनधारकांनी ३१ डिसेंबरपर्यंत प्रमाणपत्र सादर करावे, अन्यथा निवृत्ती वेतन मिळणे बंद होईल. वर्षातून एकदा पेन्शनधारकांना त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणजेच जीवन प्रमाणपत्र ३० नोव्हेंबरपूर्वी सादर करावे लागते, परंतु यावेळी ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

                           आयटी रिटर्न भरणे---

     सरकारने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवली होती. नवीन आयकर पोर्टल आणि करोना विषाणूमुळे उद्भवलेल्या अडचणींमुळे केंद्र सरकारने मुदत वाढवली होती. आता आयकरदात्यांना ३१ डिसेंबरपर्यंत त्यांचा आयटीआर भरावा लागेल, जेणेकरून दंड टाळता येईल.

                        ३१ डिसेंबरपर्यंत कमी व्याजावर गृहकर्ज---

     तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल, तर तुम्ही ३१ डिसेंबरपर्यंत स्वस्त गृहकर्जाचा लाभ घेऊ शकता. सणासुदीच्या हंगामात बँक ऑफ बडोदाने गृहकर्जाचा दर 6.50 टक्क्यांपर्यंत कमी केला होता, जो 31 डिसेंबरपर्यंत उपलब्ध होता. ही सूट १ जानेवारीपासून संपणार आहे.

                            डीमॅट-ट्रेडिंग खात्याचे केवायसी---

     भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (सेबी) ने डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांचे केवायसी करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढवली आहे. डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यातील केवायसी अंतर्गत नाव, पत्ता, पॅन कार्ड क्रमांक, मोबाइल क्रमांक, वय, योग्य ईमेल आयडी यासारखे तपशील अपडेट करावे लागतील.

                  १ जानेवारीपासून बदलणार ऑनलाइन पेमेंटचे नियम---

     भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सर्व व्यापारी आणि पेमेंट गेटवे यांना ग्राहकांचे संवेदनशील तपशील आणि त्यांच्या शेवटी सेव्ह केलेले डेबिट आणि क्रेडिट कार्डचे तपशील हटविण्यास सांगितले आहे. म्हणजेच आरबीआयच्या आदेशानंतर, व्यापारी आणि पेमेंट गेटवे यांना त्यांच्या सर्व्हरवर साठवलेली सर्व माहिती हटवावी लागेल. याचा अर्थ व्यापारी वेबसाइटवर पेमेंट करण्यासाठी वापरकर्त्याला संपूर्ण कार्ड तपशील एंटर करणे आवश्यक आहे. जानेवारीपासून, जेव्हा तुम्ही व्यापाऱ्याला पहिले पेमेंट करता, तेव्हा तुम्ही प्रमाणीकरणाच्या अतिरिक्त घटकासह (AFA) तुमची संमती देणे आवश्यक आहे. एकदा पूर्ण झाल्यावर, तुम्ही तुमच्या कार्डचा CVV आणि OTP टाकून पेमेंट पूर्ण कराल.


--लोकसत्ता ऑनलाइन
--------------------


                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-लोकसत्ता.को)
                        --------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2022-शनिवार.