नवीन वर्ष 2022-कविता क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, January 01, 2022, 01:49:37 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                            नवीन वर्ष 2022
                                            कविता क्रमांक-5
                                          ------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-३१.१२.२०२१-शुक्रवार, गतवर्षाला निरोप देऊया, आणि दिनांक-०१.०१.२०२२-दिनांक-शनिवार, नवं-वर्षाचे मनापासून स्वागत करूया. या नवं-वर्षी(२०२२), नव्या कामांची,कार्यांची यादी करूया आणि ती वर्ष-अखेर पूर्वी पूर्ण करण्याचाही मनापासून संकल्प करूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी,कवी-कवयित्री ना या नवं-वर्षाच्या (वर्ष-२०२२) च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या नवं-वर्षानिमित्त काही  कविता.

                 नवीन वर्ष कविता 2022 –

नवीन वर्षाच्या कविता नववर्षाच्या नव्या कल्पना घेऊन आले
वर्ष नवे करुया साकार स्वप्न आपुले
आपल्या जे हवे हवे तरुणाईचे दिवस असती फुलायचे
हसायचे संगणकाचे
घेऊन शिक्षण स्वप्न आपुले फुलवायचे
महागाईवरती करू मात नाही नुसते रडायचे
कष्ट करुनी दिवस सजवुया
नाही मागे हटायचे दीनदुबळ्यांची करुया सेवा
जन्मदात्यांचा ठेवू मान चुकले असेल
मागे काही नाही आता चुकायचे
आपुले नशीब आपल्या हाती देह झिजवुया
देशासाठी देशासाठी जन्म आपला देशासाठीच मरायचे
नागरिक आम्ही नव्या युगाचे
भारतीय संस्कृती आपली शान श्रद्धा,
शांतीची मशाल घेऊन देऊ सर्वाना जीवनदान
साक्षरतेचे धडे गिरवूया नाही अडाणी राहायचे
भारत माझी मातृभूमी मानाने हे सांगायचे
शिक्षणातून फुलते जीवन सर्वांनाच पटवून द्यायचे
विचार करुनी उचला पाऊल नाही दबावात जगायचे


                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदीजानकारी.इन)
                     ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2022-शनिवार.