"मानवI,हट्ट सोड तू नवं-वर्ष-संकल्पांचा,श्रीगणेशा कर फक्त आजच्याच दिन-क्रमाचा"

Started by Atul Kaviraje, January 08, 2022, 01:50:43 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय : "संकल्प नवं-वर्षाचे "- नवं  वर्ष  सुरु  झाले  रे  झाले  की  संकल्पांची  जणू  होडच  लागते . मी  हा  संकल्प  करीन , मी  तो  संकल्प  करीन , मी  असं  करीन , मी  तसं  करीन , या  वर्षा -अखेरीपर्यंत   तो  मी  नक्कीच  पूर्ण  करीन . जिकडे -तिकडे  हा  अती -उत्साह  नुसता  पाहण्याजोगा  असतो . परंतु  मुळात  जस -जसं  वर्ष  संपत  येत , तेव्हाच  कळून  चुकतं  या  माणसाला  की  आपलं  काही  तरी  चुकतं  आहे . रोजची  कामेच  माझ्या  हातून  नीट  पूर्ण  होत  नाहीत, पार पडत नाहीत  , तेथे  संकल्पांचे  काय  ? असे  म्हणून  तो  गप्प  राहतो , व  पुन्हा  पुढील  वर्षाची  वाट  पाहात  बसतो , नव्या  संकल्पांसाठी .
             वास्तव -नवं  वर्ष  संकल्प  पूर्ण  होतात  की  नाही ?-चारोळ्या
  "मानवI,हट्ट सोड तू नवं-वर्ष-संकल्पांचा,श्रीगणेशा कर फक्त आजच्याच दिन-क्रमाचा"
--------------------------------------------------------------------------


(1)
"संकल्प"  पूर्ण  होतात  का  मोठ्या  उत्साहाने  प्रथम  दिनी  केलेले  ?
वचन  कुणी  पाळते  का , कुणी  कुणाला  कधीतरी ,केव्हातरी  दिलेले  ?
ही फक्त  बोलाचीच  कढी  अन  बोलाचाच  भात  उरतो , नव्हे  प्रत्यक्षातच  दिसतो ,
सुरुवातीला  दाखविलेला  उत्साह , शेवट  होण्यापूर्वीच  हळू -हळू  मावळत  जातो .

(2)
मी  हे  करीन ,मी  ते  करीन ,घेतलेला  "संकल्प"  नक्कीच  पूर्ण  करीन
पाहात  राहा  तुम्ही ,नाही  जमले  मागल्या  वर्षी , यावर्षी  शेवटासच  नेईन
माणसाचे  प्रयत्न  फार  थोडे  अन  पडतात  तोकडे , त्याला  हे  कधीच  कळतं  नसतं ,
तो  ठरवतो , अन  हे  दैवच ,नशीबच  त्याला  ते  पूर्णत्त्वास  नेऊ  देत  नसतं .

(3)
नवं -वर्षाच्या  प्रथम  २  महिने  असतो ,मनुष्याचा  अती  उत्साह
पुढचे  ४  महिने  त्याचा  कल  असतो , "संकल्पाच्या"  चाल -ढकलीकडे
पुढचे  ४  महिने  सुरुवातीच्या  यादीमधली  ५० % कामे  होता -होता  मुश्कील ,
अशातऱ्हेने  शेवटचे  २  महिने  वर्ष  सरता  अखेरीस , तो  होतो  पूर्णपणे  हवालदिल .

(4)
बळ  तोकडे  पडते ,ताकदीला  आहेत  मर्यादा ,कितीही  असला  जरी  तो  खंदा
"संकल्प"पूर्ण न  होण्याची असते खंत,मनास  लागते  हुरहूर  एकदा ,दोनदा ,कित्येकदा
अडचणी  येतात , हाती  घेतलेलं  कामच  होत  नाही  पूर्ण ,तर  "संकल्पाचे"  सोडाच ,
करायला  जातो  एक , अन  होऊन  बसतं  भलतंच ,कार्यात  सदैव  येतो  खोडाचं .

(5)
तेव्हा  हे  मर्त्य  मानवा ,दुसरा  करतो  म्हणून  तू  ते  का  करतोस  ?
नाही  जमत  तरी  तू  त्याच्या  आहारी  का  जातोस , व्यर्थ  वेळ  घालवतोस  ?
तुझ्या  चाकोरीत  बसतील  एवढीच  कामे  तू  कर ,धाव  तुझी  कुंपणापर्यंतच ,
"संकल्पांचा"  हट्ट  सोड ,शर्यतीचा  नाद  सोड ,राहा  आपल्या  औकातीतच .

(6)
आता  आपले  हे  "संकल्पाचे"  घोडे  दौडवणे  बंद  कर ,पल्ला  खूप  लांबचा  आहे
थिटी  तुझी  शक्ती ,पायाखाली  तांबडी  माती ,वर  निळे  आभाळ  आहे
कुठवर घालणार तू गवसणी,चालता-चालता तू  थकूनच  जाशील ,गलीत -गात्र  होशील ,
या  "संकल्पांचे"  वेड  सोड ,शहाणा  हो ,आताचे  आजचे  पहा , होऊन  क्रियाशील .

(7)
"संकल्पांची"  ऐशी  तैशी ,वेळ  धावत  आहे , पंख  लावून  उडत  आहे
पाहता -पाहता  वर्ष  सरून , नवं -वर्षाची  पुन्हा  चाहूल  लागत  आहे
दिवस -रात्रीचे  हे  चक्र  अथक  फिरतेय ,मानवा  कितपत  पुरा  पडशील  ?
"संकल्प"  आपले  पूर्ण  करण्या -आधीच  धपकन  तोंडघशीच  पडशील  !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.01.2022-शनिवार.