म्हणी-"गुरुची विद्या गुरूला फळली"

Started by Atul Kaviraje, January 09, 2022, 06:18:24 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "गुरुची विद्या गुरूला फळली"

                                           म्हणी
                                       क्रमांक-100
                               "गुरुची विद्या गुरूला फळली"
                              ---------------------------


100. गुरुची विद्या गुरूला फळली
      -------------------------

--एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.
--दुस-यांना फसविण्याचा प्रयत्न केल्यास स्वतः फसल्या शिवाय राहात नाही.
--दुसर्‍याचे वाईट करण्याचा उपदेश ज्‍यानें केला त्‍याच्यावरच त्‍या उपदेशाचा प्रयोग होणें. ज्‍याला शिकविले तोच वाईटवर. [एका मनुष्‍यास दुसर्‍याचे काही देणें होते तेव्हां तो वकीलाकडे गेला. त्‍याने त्‍यास वेड्याचे सोंग घेऊन नुसता 'बे' असा उच्चार करण्यास सांगितले. तेव्हां कोर्टात त्‍याने प्रत्‍येक प्रश्र्नास 'बे' असे उत्तर दिले तेव्हां तो वेडा ठरून त्‍याचे देणें सुटले. पुढे वकिलाने आपली फी मागितली. तेव्हां त्‍याने त्‍यालाहि बे असेच उत्तर दिले व त्‍याची फी बुडविली. याप्रमाणें गुरूची विद्या गुरूला फळली.] 'शिष्‍य झाले मस्‍त गुरूची विद्या गुरूवर फिरली' -अफला पृ. ७०.१५.

                          उदाहरण---

"गुरुची विद्या गुरुला" या अर्थाचे संस्कृत सुभाषित फक्त वाचले होते. आज त्याचा प्रत्ययही "याचि देहि, याचि डोळा !" अनुभवता आला...
गेल्या काही दिवसांपासून मी वैदिक गणिती पध्दतीने गणिती क्रिया करण्याचे शिकत आहे. वेळ, श्रम इ. बाबींची बचत करुन चटकन उत्तरे कशी मिळवायची ? याची फार सुंदर उदाहरणे "वैदिक गणित"मध्ये दिलेली आहेत.
९, ९९, ९९९... अशा संख्यांनी कितीही अंकी संख्येस गुणण्याची पध्दत आज सकाळी मी शिकत होतो. पहिल्या दोन पायर्‍या मला समजल्या पण; तिसरी आणि शेवटची पायरी मला काही समजेना!
आज ५ वीच्या वर्गात गणिताच्या १ल्या तासाला ही समस्या मी विद्यार्थ्यांसमोर मांडली. अंदाजे १० मिनीटांत श्रीराज पवारने शेवटच्या तिसर्‍या पायरीतला पहिला टप्पा कसा पूर्ण करायचा हे अचूक ओळखले आणि थोड्याच वेळात मुलींच्यामधून आलेल्या सामूहिक आवाजाने शेवटच्या तिसर्‍या पायरीतील शेवटचा दुसरा टप्पा सुध्दा अचूकरित्या पूर्ण केला. "आभाळ ठेंगणं " होण्याचा काय अनुभव असतो? ते अनुभवल्या सारखं मला वाटायला लागलं होतं!
"आजपर्यंत मी तुम्हाला गणित शिकवत होतो पण; बाळांनो! आज तुम्ही मला गणित शिकलंत!" असं मी म्हणताच मृणाली म्हणाली,"नाही सर! तुम्ही आम्हाला खुप काही शिकवलंत म्हणूनच आम्हाला हे गणित सोडवता आलं!" त्यांनी शोधलेल्या उत्तराबरोबरच विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेच्या भावनेचं जेवढं कौतुक करावं;तेवढं ते खरच कमी आहे!
"विद्या गुरुणां गुरुः!।


                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-फेसबुक.कॉम)
                      ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.01.2022-रविवार.