"१०-जानेवारी–दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, January 10, 2022, 11:04:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१०.०१.२०२२-सोमवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                    "१०-जानेवारी–दिनविशेष"
                                   ------------------------


अ) १० जानेवारी रोजी झालेल्या घटना.
   ------------------------------

१६६६: सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले.

१७३०: पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.

१८०६: केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.

१८१०: नेपोलियन बोनापार्ट यांनी जोसेफाइन या त्यांच्या पहिल्या पत्‍नीला घटस्फोट दिला.

१८६३: चार्ल्स पिअर्सन यांच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.

१८७०: मुंबई मधील चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले.

१८७०: जॉन डी. रॉकफेलर यांनी स्टँडर्ड ऑईल कंपनीची स्थापना केली.

१९२०: पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.

१९२६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले.

१९२९: जगात अमाप लोकप्रियता मिळालेले द अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.

१९६६: भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.

१९७२: पाकिस्तान मधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे परतले.

=========================================

ब) १० जानेवारी रोजी झालेले जन्म.
   ----------------------------

१७७५: बाजीराव पेशवे (दुसरे) यांचा जन्म. (मृत्यू: २८ जानेवारी १८५१ – ब्रम्हावर्त)

१८९६: वास्तुसंग्राहक दिनकर गंगाधर केळकर यांचा जन्म. (मृत्यू: १२ जानेवारी १९६६)

१९००: महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १९६३)

१९०१: इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा पनवेल येथे जन्म.

१९१९: संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे यांचा जन्म.

१९२७: तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांचा जन्म.

१९३०: भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखकबासु चटर्जी यांचा जन्म. (मृत्यू: ४ जून २०२०)

१९४०: पार्श्वगायक व संगीतकार के. जे. येसूदास यांचा जन्म.

१९५०: आदिवासींसाठी आयुष्य वेचणारया नाजुबाई गावित यांचा जन्म.

१९७४: हिंदी चित्रपट अभिनेते ह्रितिक रोषन यांचा जन्म.

=========================================

क) १० जानेवारी रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------------

१७६०: पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर दत्ताजी शिंदे यांचे निधन.

१७७८: स्वीडीश वनस्पतीतज्ञ कार्ल लिनिअस यांचे निधन. (जन्म: २३ मे १७०७)

१९९९: स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर यांचे निधन.

२००२: ख्यालगायक, गुरु व बंदिशकार पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १९२४)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.01.2022-सोमवार.