चारोळ्या-"११० वय माझ्या रेल्वे-गाडी-आजीचे,वस्त्र-कापड दिल जातंय तिला मान-पानाचे"

Started by Atul Kaviraje, January 11, 2022, 01:35:33 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय  : अकोला  येथे , शकुंतला  या  रेल्वे -गाडीचा  रेल्वे  यार्डात  ११० -वा  वाढदिवस  साजरा  करण्यात  आला . तिला  साडी  चोळी  वाहून , आहेर  देऊन , अनोखा  वाढदिवस  साजरा  केला . गेली  ३  वर्षे  ती  रेल्वे  यार्डात  उभी  आहे . शकुंतला  बचाव  सत्याग्रह  समितीने  हा  अनोखा  निर्णय  घेऊन  तिच्या  बचावासाठी  हे  पाऊल  उचलले  होते .
                   रेल्वे  गाडीचा  अनोखा  वाढदिवस-चारोळ्या
  "११० वय माझ्या रेल्वे-गाडी-आजीचे,वस्त्र-कापड दिल जातंय तिला मान-पानाचे"
--------------------------------------------------------------------------


(1)
आमच्या  "गाडी -आजीच्या"  "वाढदिवसा"  या  सर्वांनी , वय  वर्षे  ११०  फक्त
फलक  होते  लागले  रेल्वे -यार्डात ,सजवले  होते  फुला -माळांनी  "गाडी -आजीला"
स्त्रिया  तिला  ओवाळीत  होत्या , खणI -नारळांनी  ओटी  भरीत  होत्या ,
कापड-चोपड,साडी -चोळीचा आहेर, कौतुकाने तिला दिला जात होता या मानपानाला .

(2)
होय  मित्रांनो , आज  आमच्या  वयो -वृद्ध  "गाडी  आजीचा"  "वाढदिवस"  आहे
अथक  सेवा  देऊन  रेल्वेला ,प्रवाश्याना  ती  आता  थकली  आहे , सुरकुतली  आहे
परी , ११०  वर्षांची  परंपरा  राखून  ती ,अजुनी  उभी  आहे ,वाकली  नाहीय ,
तिचा  रंग  उडालाय  सारा ,इंजिन  झालंय  जुनं ,पण  चाक  अजुनी  रुळावरच  आहे .

(3)
अनोखा"वाढदिन"साजरा होत होता,"शकुंतला रेल्वे-गाडी-आजीचा", आज  रेल्वे  यार्डात
बंद  होऊन  झाली होती  ३  वर्षे ,वसI  घेतला  होता  तिने  अथक  धावण्याचा
पण  कालाय  तस्मै  नमः ,काळापुढे  कुणीही  नाही  बलवान ,काळ  आहे  महान ,
एकेकाळी रुळांवरून दिमाखात सुसाट दौडणारी,"शकुंतला गाडी-आजी",आज वृद्ध  झालीय  वयानं .

(4)
अकोल्यातील हा  अजब-गजब"वाढदिवस""रेल्वे-गाडीचा"सारे डोळे भरून  पाहात  होते
"शकुंतला"  बचाव  सत्याग्रह  समितीने , यासाठी  विशेष  पुढाकार  घेतले  होते
तारुण्य ओलांडून वार्ध्यक्यात प्रवेश करिती झाली होती,आज आमची"शकुंतला गाडी-आजी" ,
जमले होते "वाढदिवसा" रेल्वे-मंडळाचे अधिकारी ,मोटरमन ,गार्ड  सारे  आजी -माजी .

(5)
तिचे  पुन्हा  धावणे  होते  अशक्य , आता  रुळावरून  दौडणे   होते  अशक्य
पण त्यातल्या-त्यात टिकविण्याचा  प्रयत्न  करीत  होती  समिती ,जेवढे  होते  तेवढे  शक्य
"शकुंतला गाडी-आजी" आज नटली  होती ,थटली  होती ,खुलली  होती ,पाहात  होती ,
मानपान  "वाढदिवसाचे" ,साडी -चोळीचा  आहेर  प्रेमाने  ती  स्वीकारीत  होती .

(6)
खूप पावसाळे पाहिलेली"गाडी-आजी",आज नातवंडांसोबत बोलत होती,काही सांगत  होती
आपला क्षीण-जीर्ण झालेला भोंगा(HORN)वाजवून त्यांना धन्यवाद देत होती,आभार मानत  होती
"वाढदिवसाच्या"निमित्ते का होईना,तुम्हा माझी आठवण झाली,ती भावना-विवश होत होती ,
उरल्या-सुरल्या आयुष्याची जबाबदारी घेणाऱ्या समितीकडे ती आनंदाने पाहात होती,त्यांची  ऋणी  होती .

(7)
अश्या अनेक जुन्या गाड्या आहेत यार्डात  उभ्या  खितपत , ज्यांचा  प्रवास  संपला  आहे
जीर्ण -जर्जर  अश्या  अवस्थेत दिसताहेत , जीवन  सरलंय ,मरण  डोळ्यांपुढे  आहे
शक्य होईल तितकी जबाबदारी त्यांची बचाव समितीने घ्यावी,त्यांचा जीर्णोद्धार व्हावा,त्यांची  पुनर्र -बांधणी  व्हावी ,
रेल्वेच्या इतिहासात त्यांनी आपले योगदान दिलंय,रेल्वेच्या शिरपेचात मानाचा तुराच  खोवला  आहे .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.01.2022-मंगळवार.