चारोळ्या-"जिवंतपणी जेवण घातले अंत्यविधीचे,रीती-रिवाज मोडून विधी केले तेराव्याचे"

Started by Atul Kaviraje, January 12, 2022, 01:57:36 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

  विषय : अमरावती  येथे , सेवा -निवृत्त  पोलीस  अधिकारी  श्री .डबरासे  यांनी , आपल्या  जिवंतपणीच  तेराव्याच्या  सोहळ्याचे , कार्यक्रमाचे  आयोजन  केले . मृत्यू  नंतर  हा  तेराव्याचा  सोहळा ,कार्यक्रम  पहाता  येणे  अशक्य  यासाठी  त्यांनी  ही  GET-TOGETHER-ची  कल्पना  राबवली  होती .
              तेराव्याचा  जिवंतपणीच  अनोखा  कार्यक्रम -चारोळ्या
    "जिवंतपणी जेवण घातले अंत्यविधीचे,रीती-रिवाज मोडून विधी केले तेराव्याचे"
--------------------------------------------------------------------------


(1)
GET-TOGETHER-ला  माणसे  जमली  होती ,बुफे  डिनर -लंच  आवडीने  घेत  होती
चेहऱ्यावर  त्यांच्या  होता  आनंद ,जरी  ते  "तेराव्याचे"  जेवण  होते , चवीने  जेवत  होते
मित्रहो,अजब कहाणी "तेराव्याची",जिवंतपणीच  घास  घेत  होते  स्वतः  "श्री .डबरासे" ,
मृत झाल्यानंतरचे अनुभव घेतोय मी, माझ्याच "तेराव्याचे"  जेवतोय , म्हणत  होते  असे .

(2)
सन्माननीय  पोलीस  अधिकारी  "श्री .डबरासे"  यांची  सेवा -निवृत्ती  झाली  होती
सालस,प्रामाणिक,कर्तव्य-परायण ,कर्तव्य -कठोर , अशी  त्यांची  आजवर  ख्याती  होती
अतिशय  प्रगल्भ  विचारांचे ,द्रष्टे ,पुरोगामी  विचारांना  चालना  न  देणारे ,"डबरासे" ,
आज काहीतरी जगावेगळी,कधीही न पाहिलेली,ऐकलेली अनोखी गोष्ट करून दाखवीत  होते .

(3)
मंडप सजला  होता ,फुला -माळा -तोरणांनी  शोभत  होता ,खुर्च्या -टेबले  मांडली  होती
अमरावती  प्रसिद्ध  कॅटरर्सना  जेवणाची  ऑर्डर  दिली  होती ,पंगत  बसली  होती
मनसोक्त  खा ,मनमुराद  खा ,पोटभर  जेवा ,"डबरासे" साऱ्यांना  आग्रह  करीत  होते ,
कसे  काय  वाटले  माझ्या "तेराव्याचे"  जेवण ,आवडले  का ,पंगतींना  विचारीत  होते .

(4)
मित्रानो ,सत्य -घटना,आगळा-वेगळा  सोहळा-कार्यक्रम  "तेराव्याचा"  येथे  घडत  होता
जिवंतपणी"श्री.डबरासे"यांनी,आपल्या मरणानंतरचा GET-TOGETHER जेवणाचा  सारा  घाट  घातला  होता
विनोदाने म्हणत होते,मला काही माझ्या"तेराव्याला" नाही  जेवता  येणार ,मरणI -नंतर ,
म्हणून  मी  आताच  जेवून  घेतोय  माझ्या  "तेराव्याचे" ,नंतरला  आहे  खूपच  अंतर .

(5)
काय  म्हणावे  या  व्यक्ती -वल्लीला , जिवंतपणी  असा  सोहळा  कुणी  करतो  का  ?
स्वतःच्या  "तेराव्याचे" -श्राद्धाचे  स्वतःच  उपस्थित  राहून  कुणी  कधी  जेवतो  का ?
पण साऱ्या पुरोगामी खुळचट कल्पनांना देत तिलांजली "डबरासेनी" हे करून दाखवलंय,
नातलग,गणगोत,सगेसोयरे यांचेसह मांडीला मांडी लावून,त्यांनी स्वतःच्या"तेराव्याचे"जेवून  दाखवलंय .

(6)
पुढची  कहाणी  ऐकाल,  तर उडIलच  तुम्ही ,आश्चर्याचा  तुम्हा  धक्काच  बसेल
"डबरासे"  सर्वांबरोबर  सेल्फी  घेत  होते ,हात  मिळवत  होते ,विनोद  करीत  होते
छोट्यांबरोबर खेळत होते,वृद्धांना नमस्कार करीत होते,जगावेगळे करतोय त्यांच्या  खिजगणतीतही  नव्हते ,
कळस म्हणजे,वडीलधारी त्यांच्या या"तेराव्याच्या"कार्यक्रमास  चक्क  त्यांना  दीर्घायुष्याचे  आशिष  देत  होते .

(7)
यम  आणि  यमदूत  हा  सोहळा  स्वर्गातून  पहात  होते , तोंडात  बोटे  घालीत  होते
आम्हाला का नाही  धाडला  सांगावा जेवणाचा  "डबरIसेंच्या" , खंत  व्यक्त  करीत  होते
जिवंतपणीच स्वतःच्या"तेराव्याचे"जेवण घालणारा हा मर्त्य (अमर्त्य?)मानव ते प्रथमच  पहात  होते ,
तूर्तास तरी त्यांनी त्यांचे मरण लांबवले होते,अमरत्त्व नसले तरी,दीर्घायुष्याचे दान दिले होते


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.01.2022-बुधवार.