II मकर संक्रांति II-लेख क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, January 14, 2022, 12:05:22 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       II मकर संक्रांति II
                                          लेख क्रमांक-१
                                      -------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०१.२०२२-शुक्रवार आहे. मकर संक्रांतीचा खास पर्व-सण घेऊन हा शुक्रवार आला आहे. बाहेर थंडी आहे. तीळ-गुळाचे लाडू खाऊन शरीरात उब-स्नेह येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा. " तीळ-गूळ घ्या, गोड-गोड बोला". या सणI-निमित्त वाचूया मकर संक्रांतीवर  विशेष लेख, इतिहास, महत्त्व, माहिती,पूजा, कथा, निबंध, सदिच्छा, शुभेच्छा आणि बरंच काही.

     "मकर संक्रांती हा सण उत्तर भारतात दरवर्षी १४ जानेवारीला साजरा केला जातो. सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषात संक्रांत म्हंटले जाते. ... १४ जानेवारी २०२२ रोजी मकर राशीत ३ ग्रहांचा संयोग होईल, यासोबतच बुद्धादित्य योगही तयार होणार आहे."

     मकर संक्रांति २०२२ तारीख तिथी माहिती, ह्यांची आपण माहिती घेणारच आहोत परंतु त्या पूर्वी आपण बघणार आहोत कि मकर संक्रांति ला देशात आणि राज्यात कोणकोणत्या वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते .

     जसे कि , महाराष्टा मध्ये मकरसंक्रांत म्हणतात ,व तामिळनाडू मध्ये पोंगल म्हणतात , तसेच गुजरात आणि राजस्थान ह्या राज्यांमध्ये उत्तरायण असे म्हणतात , आणि पंजाम आणि हरियाणा मध्ये लोहळी म्हणतात ,अजून कर्नाटक ,केरळ,आंध्रप्रदेश व बिहार ह्या राज्यांमध्ये संक्रांति तसेच आसाम मध्ये बिहू असे म्हणतात . अश्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी नIवे असलेला हा Sankranti २०२२ चा सण खूप आनंदाचा आणि उत्साहाचा असतो . परंतु काही जणांना हा प्रश्न नक्कीच पडला असेलच कि हा सण दरवर्षी एकाच तारखेला कसा येतो . म्हणजेच  त्या बद्दल शास्त्रीय माहिती आपण बघूयात.

1. Why Makar Sankranti on 14 January ? | मकर संक्रांति सण दरवर्षी एकाच तारखेला कसा येतो ?
2. Sankranti 2022 Date Tithi | मकर संक्रांत २०२२ मध्ये तारीख तिथी कधी आहे ?
2.1. Makar Sankranti 2022 Date Tithi | मकर संक्रांत २०२२ तारीख तिथी
सौर चक्र म्हणजेच solar cycle हे दर ८ वर्षांनी बदलते त्या मुळे हा सण दर ८ वर्षांनी १५ जानेवारीला येतो . आणि दर वर्षी मात्र हा सण एकाच तारखेला म्हणजेच १४ जानेवारीला येतो .

     मकर संक्रांतीच्या दिवशी दिवस आणि रात्र हे समान काळासाठी असतो. मात्र संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसा पासून दिवस हा मोठा आणि रात्र लहान होत असते .तसेच हवेतील गारवा कमी होऊन उष्णता प्रत्येक दिवशी वाढायला लागते . या संक्रांति नंतर ऋतू बदल होत असतो.

              मकर संक्रांत २०२२ मध्ये तारीख तिथी कधी आहे ?---

     आता पर्यंत आपण संक्रांति बद्दल थोडी माहिती जाणून घेतलेली आहे , आता आपण जाणून घेऊयात कि ह्या वर्षी म्हणजेच २०२२ sankranti कधी कोणत्या दिवशी येत आहे याच्याबद्दल.

     मकर संक्रांत ही सर्व संक्रांती पैकी सर्वात महत्त्वाची संक्रांत मानली जाते, तसेच मकर संक्रांतीला काही ठिकाणी खिचडीचा सण असेही म्हणतात. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान यांचे हि विशेष महत्त्व पुराणात सांगण्यात आले आहे.

     ह्या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये, मकर संक्रांतीचा सण पंचांगानुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी म्हणजेच 14 जानेवारी 2022 रोजी साजरा केला जाईल. या दिवशी सूर्य धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करेल. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा या प्रक्रियेला मकर संक्रांती असे म्हणतात

                     मकर संक्रांत २०२२ तारीख तिथी---

मकर संक्राति तारीख : १४ जानेवारी २०२२
मकर संक्राति वार : शुक्रवार
मकर संक्राति शुभ वेळ : दुपारी 02 वाजून 43 मिनिटे पासून सुरु होऊन तो संध्याकाळी 05 वाजून 45 मिनिटं पर्यंत असणार आहे.
अवधि : 03 तास 02 मिनिटे
मकर संक्राति महा पुण्य वेळ : दुपारी 02 वाजून 43 मिनिटे पासून सुरु होऊन तो संध्याकाळी 04:28 वाजेपर्यंत असणार आहे.
अवधि : 01 तास 45 मिनिटे.

पूनम  एम.
----------

                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी फेस्टिवल.कॉम)
                   ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.01.2022-शुक्रवार.