II मकर संक्रांति II-निबंध क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, January 14, 2022, 12:17:38 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        II मकर संक्रांति II
                                          निबंध क्रमांक-2
                                      --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०१.२०२२-शुक्रवार आहे. मकर संक्रांतीचा खास पर्व-सण घेऊन हा शुक्रवार आला आहे. बाहेर थंडी आहे. तीळ-गुळाचे लाडू खाऊन शरीरात उब-स्नेह येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा. " तीळ-गूळ घ्या, गोड-गोड बोला". या सणI-निमित्त वाचूया मकर संक्रांतीवर  विशेष लेख, इतिहास, महत्त्व, माहिती,पूजा, कथा, निबंध, सदिच्छा, शुभेच्छा आणि बरंच काही.

                         मकरसंक्रांत निबंध

     दरवर्षी १४ जानेवारीला संक्रांतीचा सण येतो. या दिवशी सूर्य मकरवृत्ताकडून उत्तरेकडे सरकतो. म्हणून या दिवसाला 'मकरसंक्रांत' म्हणतात.

     काही ठिकाणी संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण पाळला जातो. संक्रांत आणि भोगी या दिवसांमध्ये तीळ आणि गूळ या पदार्थांना फार महत्त्व असते. म्हणून तीळ घालून बाजरीची भाकरी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांग्याचे भरीत असा खमंग बेत असतो. बरोबर असते गुळाची पोळी. या पोळीत गुळाबरोबर तिळाचाही उपयोग केलेला असतो. तिळामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. थंडीच्या दिवसांत हा आहार शरीराच्या दृष्टीने फार फायदयाचा ठरतो.

     संक्रांतीच्या दिवशी घरातील सुवासिनी एकमेकींना संक्रांत-वाणे देतात. त्या वाणात ओला हरभरा, ऊस, बोरे, तिळगूळ यांचा उपयोग केला जातो. या सणाला काळ्या रंगाचे कपडे घालतात.

     संक्रांतीच्या दिवशी मुले आकाशात पतंग उडवून आनंद लुटतात. या दिवशी सर्वजण एकमेकांना हलवा-तिळगूळ देतात आणि 'तिळगूळ घ्या, गोड गोड बोला' असे म्हणतात. हा सण एकमेकांत स्नेह निर्माण करतो. म्हणून मला हा सण आवडतो.


                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी मी.कॉम)
                      ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.01.2022-शुक्रवार.