II मकर संक्रांति II-निबंध क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, January 14, 2022, 12:19:22 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        II मकर संक्रांति II
                                          निबंध क्रमांक-3
                                      --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०१.२०२२-शुक्रवार आहे. मकर संक्रांतीचा खास पर्व-सण घेऊन हा शुक्रवार आला आहे. बाहेर थंडी आहे. तीळ-गुळाचे लाडू खाऊन शरीरात उब-स्नेह येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा. " तीळ-गूळ घ्या, गोड-गोड बोला". या सणI-निमित्त वाचूया मकर संक्रांतीवर  विशेष लेख, इतिहास, महत्त्व, माहिती,पूजा, कथा, निबंध, सदिच्छा, शुभेच्छा आणि बरंच काही.

                       मकरसंक्रांत निबंध

     हा भारतातील पौष महिन्यात साजरा केला जाणारा सण आहे. हा सण दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला साजरा केला जातो. हा सौर कालगणनेशी संबंधीत असा सण आहे, कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सुर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो.

     मकर संक्रांत २१-२२ डिसेंबरलाच सुर्याचे उत्तरायण सुरू झालेले असते. म्हणजे सुर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. संक्रांत ही एक देवता मानली गेलेली असून ती प्रतीवर्षी वेगवेगळया वाहनांवर बसून येते. अशी समजूत प्रचलीत आहे.

     संक्रांतीचा आधला दिवस भोगी या नावाने साजरा केला जातो. या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी, मिश्र भाजी, लोणी असे पदार्थ केले जातात.

     संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्व आहे. या दिवशी सर्व मित्रमंडळी, लहान मुले हे तिळगुळ, तिळाचे लाडू, तिळाच्या वडया वाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' अशा शुभेच्छा देतात.

     विवाहित स्त्रीया या दिवसापासून हळदी-कुंकू करतात. यावेळी स्त्रीया एकमेकींना वाण वाटून 'तिळगुळ घ्या गोड बोला' अशा शुभकामना देतात.

     रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदी-कुंकवाचा शेवटचा दिवस असतो. संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे. तीळ वापरण्यातला पहिला अर्थ स्निग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह मैत्री.

     अशा तिळगुळांची देवाणघेवाण करून स्नेह वाढवायचे, नवीन स्नेहबंध जोडायचे, जुने स्नेहबंध समृध्द करायचे हाच हेतु असतो.

     या दिवशी पतंग उडविण्याची ही प्रथा आहे. तसेच या दिवशी लोक काळया रंगाचे कपडे घालतात कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो.

     अशाप्रकारे भारतात साज-या केल्या जाणा-या सणांपैकी मकर संक्रांत हा एक महत्वाचा सण आहे.

मकर संक्रांति शुभ मुहूर्त 2022
मकर संक्रांती 2022 – शुभ मुहूर्त
मकर संक्रांती पुण्यकाळ – 02:43 PM ते 05:45 PM
कालावधी – 03 तास 02 मिनिटे
मकर संक्रांती महा पुण्य काळ – 02:43 PM ते 04:28 PM
कालावधी – 01 तास 5 मिनिटे


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी मी.कॉम)
                   ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.01.2022-शुक्रवार.