II मकर संक्रांति II-निबंध क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, January 14, 2022, 12:21:30 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         II मकर संक्रांति II
                                           निबंध क्रमांक-4
                                       --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०१.२०२२-शुक्रवार आहे. मकर संक्रांतीचा खास पर्व-सण घेऊन हा शुक्रवार आला आहे. बाहेर थंडी आहे. तीळ-गुळाचे लाडू खाऊन शरीरात उब-स्नेह येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा. " तीळ-गूळ घ्या, गोड-गोड बोला". या सणI-निमित्त वाचूया मकर संक्रांतीवर  विशेष लेख, इतिहास, महत्त्व, माहिती,पूजा, कथा, निबंध, सदिच्छा, शुभेच्छा आणि बरंच काही.

                      मकर संक्रांति  निबंध

     मकर संक्रांत हा भारताच्या प्रमुख सणांपैकी एक सण आहे . हा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला साजरा करण्यात येतो . या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो व दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो . मकर संक्रांतीच्या दिवशी लोक एकमेकांना तिळगूळ देतात व तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणतात . विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू समारंभ करतात .

     या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा आहे . संक्रातीच्या दिवशी लोक काळे वस्त्र परिधान करतात . कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात . मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सण साजरा केला जातो . या दिवशी लोक तेलमिश्रित पाण्याने स्नान करतात. तीळ लावलेल्या भाकऱ्या ,वांग्याचे भरीत ,खिचडी असा जेवणाचा खास बेत या दिवशी असतो . संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा केला जातो . सगळ्यांनी मिळून मिसळून रहावे आनंदी व स्वस्थ रहावे हीच या सणाची शिकवण आहे.

     मकर संक्रात हा भारत देशातील लोकप्रिय सण आहे . हा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो . या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करतो . मकर संक्रांती पासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते तसे दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो व रात्र लहान होऊ लागते . मकर संक्रांत हा सण देशातील विविध राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो.

     जसे महाराष्ट्रात – मकर संक्रात ,तामिळनाडू – पोंगल ,गुजरात व राजस्थान – उत्तरायान ,पंजाब कर्नाटक ,केरळ ,बिहार ,आंध्रप्रदेश – संक्राती ,आसाम – बिहू इत्यादी . महाराष्ट्रात असे इतर काही राज्यांमध्ये मकर संक्रांतीच्या आधीच्या दिवशी भोगी साजरा केला जातो . भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी व पालेभाज्या तसेच ,पावटा ,वाटाणा ,वांगी ,हरभरा ,टोमॅटो इत्यादी फळभाज्यांची तीळ घालून मिश्र भाजी केली जाते .

     ही भाजी सर्व लोक आवडीने खातात कारण त्यामुळे शरीराला पुरेशी उष्णता मिळते . मकर संक्रांति दिवशी गोड पुरण पोळी केली जाते . या दिवशी सुवासिनी स्त्रिया एकमेकींना वाण देतात . यात हरभरे ,ऊस ,गहू ,तीळ गाजर इत्यादीचा समावेश केला जातो . पंढरपूर तसेच इतर देवस्थाने स्त्रिया मोठ्या प्रमाणात भेट देतात . नवीन लग्न झालेल्या नववधूसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे या दिवशी आयोजन केले जाते.

     मकर संक्रातीला महाराष्ट्रातील तिळगुळ वाटले जातात . एकमेकांना तिळगूळ देताना तिळगूळ घ्या गोड गोड बोला असे सर्वजण म्हणतात . संक्रातीला लहान मुले वडीलधाऱ्या मंडळी सोबत रंगीबेरंगी पतंग उडवतात गु. जरात मधील पतंग महोत्सव पाहण्यासाठी अनेक लोक एकत्र जमतात असा हा मकर संक्रांतीचा सण सर्वांना आनंद उत्साह व नवीन चैतन्य देतो.


--प्रीतम  संसारे
--------------


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ ज्ञान जेनिक्स.कॉम)
                   ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.01.2022-शुक्रवार.