II मकर संक्रांति II-निबंध क्रमांक-6

Started by Atul Kaviraje, January 14, 2022, 12:25:16 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         II मकर संक्रांति II
                                           निबंध क्रमांक-6
                                       --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०१.२०२२-शुक्रवार आहे. मकर संक्रांतीचा खास पर्व-सण घेऊन हा शुक्रवार आला आहे. बाहेर थंडी आहे. तीळ-गुळाचे लाडू खाऊन शरीरात उब-स्नेह येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा. " तीळ-गूळ घ्या, गोड-गोड बोला". या सणI-निमित्त वाचूया मकर संक्रांतीवर  विशेष लेख, इतिहास, महत्त्व, माहिती,पूजा, कथा, निबंध, सदिच्छा, शुभेच्छा आणि बरंच काही.

                     मकर संक्रांत सणावर निबंध –

     भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. या देशात शेतीशी संबंधित अनेक सण उत्सव साजरे केले जातात. यामध्ये काही सण शेतामध्ये पेरणी झाल्यानंतर पिकाची उगवण चांगली झाल्याच्या खुशिमध्ये साजरे केले जातात तर काही सण हे सुगीच्या वेळेस म्हणजेच पीक काढणीच्या वेळी साजरे केले जातात.

     यापैकीच मकर संक्रांती हा सण देखील शेतीशी संबंधित च आहे. हा सण बहुधा हिवाळ्यात येतो आणि यामध्ये शेतातील जी फळे व भाज्या या ऋतूमध्ये येतात त्या एकमेकांना वान म्हणून देऊन हा सण साजरा केला जातो.

     हिंदू संस्कृतीतील बहुधा सण हे चंद्र आणि सूर्य यांच्या संक्रमण कालावधी तसेच त्यांचा उगवण्याचा व मावाळण्याचा कालावधी यावरच अवलंबून असतात.

     सूर्य जेंव्हा एका राशी मधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो त्या क्रियेला विज्ञानामध्ये "संक्रमण" असे म्हटले जाते. सूर्य जेंव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्याला "मकर संक्रमण" असे म्हटले जाते. ज्या दिवशी सूर्य धन राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवशी भारतातील जवळपास सर्व हिंदू लोक हा मकर संक्रांत सण साजरा करतात.

     मराठी महिण्याणुसार हा सण पौष महिन्यात साजरा केला जातो. इंग्रजी कॅलेंडर नुसार हा सण जानेवारी महिन्यातील १४ तारखेला साजरा केला जातो. हिंदू धर्मातील कोणत्याच सणाची तारीख निश्चित नसते पण मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे जो दरवर्षी जवळपास १४ जानेवारीला येतो.

     याकाळात सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे मार्गक्रमण करीत असतो. तसेच असेही म्हटले जाते की या काळात दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान असते.

                 मकर संक्रांतीच्या दिवशी कशी तयारी केली जाते---

     मकर संक्रांत हा सण स्त्रियांसाठी खूप खास व महत्वाचा असतो. या दिवशी स्त्रिया हिवाळा ऋतूमध्ये शेतात जी कोणती फळे येतात ती सर्व एकमेकींना वान म्हणून देतात. तसेच या दिवशी सूर्याला व देवाला तीळ गुळाचा नैवेद्य दाखवला जातो.

     संक्रांतीच्या वेळी थंडी असते. त्यामुळे या दिवसात शरीराला उष्णता देणारे तीळ आणि गूळ या पदार्थांना फार महत्व असते. या दिवशी सुवासिनी दुसऱ्या सुवासिनीला सुगडाचा वसा देतात.

     सुगडाचा वसा  म्हणजे छोट्या मडक्यात वेगवेगळ्या फळांचे तुकडे जसे की गाजर, पेरू, बोरं, उसाचे काप, गव्हाच्या बोंब्या , भुईमागाच्या शेंगा तसेच इतर फळे यात टाकून त्यांना हळदी कुंकू लावून ते सुवासिनिला दिले जाते. याला "सुगडे वसने" असे म्हटले जाते. तसेच या दिवशी तीळ आणि गूळ यांपासून लाडू बनवले जातात. ते लाडू एकमेकांना देऊन "तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला" असे उद्गार काढले जातात.

     या दिवशी जेवणामध्ये खासकरून गुळाची पोळी बनवली जाते आणि तूप असते.


                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीसंग्रह.इन)
                    ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.01.2022-शुक्रवार.