II मकर संक्रांति II-निबंध क्रमांक-7

Started by Atul Kaviraje, January 14, 2022, 12:27:09 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        II मकर संक्रांति II
                                          निबंध क्रमांक-7
                                      --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०१.२०२२-शुक्रवार आहे. मकर संक्रांतीचा खास पर्व-सण घेऊन हा शुक्रवार आला आहे. बाहेर थंडी आहे. तीळ-गुळाचे लाडू खाऊन शरीरात उब-स्नेह येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा. " तीळ-गूळ घ्या, गोड-गोड बोला". या सणI-निमित्त वाचूया मकर संक्रांतीवर  विशेष लेख, इतिहास, महत्त्व, माहिती,पूजा, कथा, निबंध, सदिच्छा, शुभेच्छा आणि बरंच काही.

                        मकर संक्रांत सणावर निबंध –

                         मकर संक्रांत सणाचे महत्त्व---

     हिंदू संस्कृतीमध्ये मकर संक्रांत (makar sankranti) या सणास फार महत्व आहे. हा सण भारतभर सर्वत्र मोठ्या उत्सवाने आणि आनंदाने साजरा केला जातो. या सणाला वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी नावे आहेत. महाराष्ट्रात या सणाला "मकर संक्रांती" असे संबोधले जाते. तसेच पंजाब आणि हरियाणा सारख्या राज्यामध्ये हा सण नवीन येणाऱ्या पिकाच्या स्वागतासाठी साजरा केला जातो.

     या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा आहे. बाजारामध्ये रंगीबेरंगी पतंग आणि मांजा घेण्यासाठी लोकांची गर्दी असते. पतंग उडवण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा धागा वापरला जातो त्याला "मांजा" असे म्हणतात. या दिवशी सर्वजण पतंग उडवताना त्यामुळे सर्व आकाश पतांगानी व्यापून घेतल्यासारखे भासते.

     सांस्कृतिक दृष्ट्या देखील या सणाला खूप महत्व आहे. या दिवशी लेक एकत्र येतात आणि तिळाचे लाडू एकमेकांना देऊन "तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला" असे म्हणतात. या दिवशी भांडणे वैर विसरून सर्वजण एकमेकांना तिळगूळ देतात आणि गोड बोलून सलोख्याचे संबंध निर्माण करतात. या दिवशी ज्या लोकांचे संबंध चांगले आहेत त्यांचे संबंध आणखीच दृढ होतात.

     मकर संक्रांत सणाच्या काळात काळया वस्त्रांना खूप महत्व दिले जाते कारण असे म्हणतात की काळे वस्त्र उष्णता शोषून घेतात. त्यामुळे बाजारात काळया रंगाचे कपडे घेण्यास लोक गर्दी करतात.

     हा सण नवविवाहित स्त्रियांसाठी खूप खास असतो. लग्नानंतर प्रथम येणाऱ्या मकर संक्रांतीला नवविवाहित मुलीला काळया रंगाचे वस्त्र दिले जातात व भेटवस्तू ही दिल्या जातात. या दिवशी महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात. यात सर्व सुवासिनी मिहीलांचा समावेश असतो. यात स्त्रिया एकमेकींना कुंकू लावून त्यांची ओटी भरतात.

     महाराष्ट्रात हा सण तीन दिवसाचा असतो. पहिल्या दिवसाला भोगी म्हटले जाते, दुसऱ्या दिवसाला संक्रांत म्हटले जाते व तिसऱ्या दिवसाला कांक्रात असे म्हणतात.

     या दिवशी एकमेकांना तिळगुळ दिला जातो व तसेच या सणाच्या शुभेच्छा देखील देतात.

                          मकर संक्रांत कथा---

     मकर संक्रांत निमित्त अनेक कथा प्रचलित आहेत. यातील एका कथेत सांगितले जाते की, फार वर्षापूर्वी एक संकासुर नावाचा दृष्ट राक्षस होता. तो तेथील गरीब जनतेला खूप त्रास देत असे व त्याला मारणे सामान्य जनतेसाठी फार कठीण होते. अशा वेळी त्या लोकांची मदत करण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप धारण करून संकसुराचा वध केला होता. त्यामुळे तेथील जनता खूप आनंदित झाली होती. तेंव्हापासून हा मकर संक्रांत सण साजरा केला जातो.


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीसंग्रह.इन)
                   ------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.01.2022-शुक्रवार.