वेडापिसा, झालो कसा, सांगना.

Started by amoul, April 24, 2010, 04:35:33 PM

Previous topic - Next topic

amoul

वेडापिसा, झालो कसा, सांगना.

तू रम्य पहाट, सुखाची वाट, तू सुगंधी पारिजात.
तू चांदणी नभात, सावली उन्हात,इंद्रधनुचे रंग सात.
तुझ्या रंगागंधाची झाली फुलांना नशा.
वेडापिसा, झालो कसा, सांगना.

तुला होता उशीर,सुटतो धीर, अशी माझी अवस्था.
मी हसतो स्वताशी,बोलतो स्वताशीच,तू जवळी नसता.
तडफडतो मी पाण्याविना मासा जसा.
वेडापिसा, झालो कसा, सांगना.

तू माझे धैर्य, तू माझा सुर्य, तूच माझे सर्व.
लढण्याची शक्ती, जिंकण्याचा जोम, देते मला तुझे प्रेम,
तू  सारया निजाणाऱ्या दिशांची उजळती आशा.
वेडापिसा, झालो कसा, सांगना.

.....अमोल