II मकर संक्रांति II-शुभेच्छा क्रमांक-5

Started by Atul Kaviraje, January 14, 2022, 01:04:36 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        II मकर संक्रांति II
                                         शुभेच्छा क्रमांक-5
                                      --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०१.२०२२-शुक्रवार आहे. मकर संक्रांतीचा खास पर्व-सण घेऊन हा शुक्रवार आला आहे. बाहेर थंडी आहे. तीळ-गुळाचे लाडू खाऊन शरीरात उब-स्नेह येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा. " तीळ-गुळ घ्या, गोड-गोड बोला". या सणI-निमित्त वाचूया मकर संक्रांतीवर  विशेष लेख, इतिहास, महत्त्व, माहिती,पूजा, कथा, निबंध, सदिच्छा, शुभेच्छा आणि बरंच काही.

                    तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला!

      आनंद आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकर संक्रांती हा उत्सव जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातो. हा उत्सव वेगवेगळ्या नावाने भारतातील विविध प्रांतात साजरा केला जातो. आपण देखील आपल्या प्रियजनांना शुभेच्छा पाठवू इच्छित असल्यास मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 2022

2022 मध्ये मकर संक्रांतीचा उत्सव 14 जानेवारी रोजी साजरा केला जाईल.

     मकरसंक्रांत शुभेच्छा मराठी: मकर संक्रांतीचा सण देशभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या सणाला खिचड़ी, उतरायण, पोंगल या नावाने सुद्धा आपल्या देशभरात Celebrate केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्र आणि नातेवाईकांना मेसेज पाठवतात आणि Makar Sankranti Chya Shubhecha देतात.

                              मकरसंक्रांती शुभेच्छा मराठी


तिळात मिसळला गुळ, त्याचा केला लाडु...
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!

हलव्याचे दागिने, काळी साडी...
अखंड राहो तुमची जोडी
हीच शिभेच्छा, संक्रांत वर्ष दिनी...!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला...!!

एक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसलाएक तिळ रुसला, फुगला
रडत रडत गुळाच्या पाकात पडला
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिळगुळ घ्या गोड गोड बोला .

घालशील जेव्हां तू Designer साडी
लाभेल तुला तिळगुळची गोडी
माझ्या हातात दे
पंतगाची दोरी
तुम्हा सर्वाना शुभ मकर संक्रांति

तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास..
SHUBH SANKRANTI!

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या...
मकरसंक्राती हादिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड बोला


                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवारसI.कॉम)
                     -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.01.2022-शुक्रवार.