II मकर संक्रांति II-शुभेच्छा क्रमांक-6

Started by Atul Kaviraje, January 14, 2022, 01:36:17 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       II मकर संक्रांति II
                                        शुभेच्छा क्रमांक-6
                                     --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०१.२०२२-शुक्रवार आहे. मकर संक्रांतीचा खास पर्व-सण घेऊन हा शुक्रवार आला आहे. बाहेर थंडी आहे. तीळ-गुळाचे लाडू खाऊन शरीरात उब-स्नेह येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा. " तीळ-गुळ घ्या, गोड-गोड बोला". या सणI-निमित्त वाचूया मकर संक्रांतीवर  विशेष लेख, इतिहास, महत्त्व, माहिती,पूजा, कथा, निबंध, सदिच्छा, शुभेच्छा आणि बरंच काही.

आकाशाला टेकतील असे हात नाहीत
माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,
चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे.
तिळगुळ घ्या गोड़ बोला.

तिळ आम्ही आहोत, तर गुळ तुम्ही
मिष्टान्न आम्ही आहोत, तर त्यातील गोडवा तुम्ही ..
वर्षाच्या पहिल्या सणापासून होत आहे सुरवात
आमच्याकडून तुम्हास हैप्पी मकर संक्रांत !!!

तिळ आणि गुऴा सारखी राहावी आपली मैञी घट्ट, आणि मधुरही
ऩात्यातील कटुंता इथेच संपवा
तिळगुळ घ्या नि गोड गोड बोला

बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दाचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा दुःखाला
तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रित असावा.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

आठवण सूर्याची,
साठवण स्नेहाची,
कणभर तीळ,
मनभर प्रेम,
गुळाचा गोड़वा,
स्नेह वाढवा...
"तिळगुळ घ्या गोड गोड बोला"

नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
गोड मित्रांना
"मकर संक्रातीच्या"
गोड गोड शुभेच्छा!


                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवारसI.कॉम)
                    --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.01.2022-शुक्रवार.