II मकर संक्रांति II-शुभेच्छा क्रमांक-8

Started by Atul Kaviraje, January 14, 2022, 01:39:52 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       II मकर संक्रांति II
                                        शुभेच्छा क्रमांक-8
                                     --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०१.२०२२-शुक्रवार आहे. मकर संक्रांतीचा खास पर्व-सण घेऊन हा शुक्रवार आला आहे. बाहेर थंडी आहे. तीळ-गुळाचे लाडू खाऊन शरीरात उब-स्नेह येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा. " तीळ-गुळ घ्या, गोड-गोड बोला". या सणI-निमित्त वाचूया मकर संक्रांतीवर  विशेष लेख, इतिहास, महत्त्व, माहिती,पूजा, कथा, निबंध, सदिच्छा, शुभेच्छा आणि बरंच काही.

हिरवा हरभरा तरारे
गोड थंडीचे शहारे
गुलाबी ताठ ते गाजर
तीळदार अन् ती बाजर

वर लोण्याचा गोळा
जीभेवर रसवंती सोहळा
डोळे उघडता हे जड
दिसे इवल्या सौख्याचे सुगड भोगीच्या हार्दिक शुभेच्छा

म...... मराठमोळा सण
क...... कणखर बाणा
र ...... रंगीबिरंगी तिळगुळ
सं...... संगीतमय वातावरण
क्रा...... क्रांतीची मशाल...
त ...... तळपणारे तेज
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

नवीन वर्षाच्या
नवीन सणाच्या
प्रियजनांना
गोड व्यक्तींना
मकरसंक्रांतीच्या
हार्दिक शुभेच्छा

तिळ-गुळ घ्या आणि गोडगोड बोला,
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा....

कणभर तिळ मणभर प्रेम
गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला....
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा

वर्ष सरले डिसेंबर गेला,
हर्ष घेऊनी जानेवारी आला,
निसर्ग सारा दवाने ओला,
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
सर्वाना मकर संक्रांतीच्या
संदेशरुपी गोड गोड शुभेछा.

नभी उंचच उंच लहरू दे पतंग,
आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग,
आणि आयुष्यात पसरू दे आनंद-तरंग....
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा....


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवारसI.कॉम)
                   --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.01.2022-शुक्रवार.