II मकर संक्रांति II-शुभेच्छा क्रमांक-11

Started by Atul Kaviraje, January 14, 2022, 01:44:56 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                       II मकर संक्रांति II
                                       शुभेच्छा क्रमांक-11
                                     --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०१.२०२२-शुक्रवार आहे. मकर संक्रांतीचा खास पर्व-सण घेऊन हा शुक्रवार आला आहे. बाहेर थंडी आहे. तीळ-गुळाचे लाडू खाऊन शरीरात उब-स्नेह येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा. " तीळ-गुळ घ्या, गोड-गोड बोला". या सणI-निमित्त वाचूया मकर संक्रांतीवर  विशेष लेख, इतिहास, महत्त्व, माहिती,पूजा, कथा, निबंध, सदिच्छा, शुभेच्छा आणि बरंच काही.

परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला
मकर संक्रातिच्यां गोड गोड शुभेच्छा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला...
_____________________________

आकाशाला टेकतील असे हात नाहीत
माझे, फुलांचे गीत ऐकावेत असे कान नाहीत माझे,
चंद्र- सुर्याला साठवुन ठेवणारे असे डोळे नाहीत माझे,
पण आपल्या माणसांची आठवण ठेवेल असे ह्रदय आहे माझे .
तिळगुळ घ्या गोड़ बोला
_____________________________

शब्दांनिच शिकवलय पडता पडता सावरायला,
शब्दांनिच शिकवलय रडता रडता हसायला,
शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि
शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ,
शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा,
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी, आणि
शब्दांमुऴेच तरऴते कधितरी डोऴ्यात पाणी...
"म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि
जो मन जिंकेल तो जग जिंकेल "
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला
_______________________________

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो
पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो
असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा
आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या...
मकरसंक्राती हादिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड बोला
____________________________

"तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा."
____________________________

"पैशाने श्रीमंत असणारी माणसे पावलो पावली भेटून जातील, पण मनाने श्रीमंत असलेली माणसे भेटण्यासाठी पावले झिझवावे लागतात, अश्याच माणसांना मकर संक्रांती च्या हार्दिक शुभेच्छा."


                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-शायरी मेरी.कॉम)
                    -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.01.2022-शुक्रवार.