म्हणी-"गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य"

Started by Atul Kaviraje, January 15, 2022, 08:35:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य"

                                             म्हणी
                                         क्रमांक-101
                               "गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य"
                              ------------------------------


101. गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य
      -----------------------------

--ज्याची वस्तु त्यालाच भेट देणे.
--दोघे दिसायला भिन्न असले तरी वस्तुतः एकच असतात.
--१. दोन व्यक्ति एकाच हितसंबंधाच्या, किंवा एकमेकांशी निकट संबद्ध असतात तेव्हां एकाविषयी दुसर्‍याची कृति किंवा मत फारसे विचारांत घेण्याचे कारण नसते. ते सिद्धसाधकाप्रमाणें असणारच. २. एकाच प्रकारच्या सदृश वस्‍तु, व्यक्ति एकमेकांचा पाठपुरावा करण्यास पुढे आल्‍या असतां म्‍हणतात.
--"गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य" अशी पूर्ण म्हण आहे. ... एखाद्या माणसाला त्याला शोभेल अशी, त्याला आवडणारी वस्तू देणे आणि त्याला खुश करणे आणि आपले काम साधने म्हणजे गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य. उदाहरणार्थ लाचखाऊ अधिकारी असतात त्याच्याकडून पैसे देऊन काम करून घ्यावे लागते पर्याय नसतो.


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.01.2022-शनिवार.