सुप्रसिद्ध संगीतकार-"पं. हृदयनाथ मंगेशकर"-"उषःकाल होता होता काळरात्र झाली"

Started by Atul Kaviraje, January 18, 2022, 01:32:50 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         सुप्रसिद्ध संगीतकार
                                      "पं. हृदयनाथ मंगेशकर"
                                     -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज ऐकुया, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध संगीतकार आणि गानकोकिळा श्रीमती लतादीदी मंगेशकर यांचे धाकटे बंधू श्री.हृदयनाथ मंगेशकर, यांनी संगीतबद्ध केलेली काही गाणी. आजच्या या गाण्याचे बोल आहेत-"उषःकाल होता होता काळरात्र झाली"


                            "उषःकाल होता होता काळरात्र झाली"
                          -----------------------------------


उषःकाल होता होता काळरात्र झाली !
अरे , पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !

आम्ही चार किरणांचीही आस का धरावी ?
जे कधीच नव्हते त्याची वाट का पाहावी ?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !

तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी ;
तेच दंश करिती आम्हा साप हे विषारी !
आम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुशाली !

तिजोऱ्यात  केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
आम्हावरी संसाराची उडे धुळमाती !
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतहि न वाली !

अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी ?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दुःखाचीही चालली दलाली !

उभा देश झाला आता एक बंदिशाला ,
जिथे देवकीचा पान्हा  दुधाने जळाला !
कसे पुण्य दुर्दैवी अन पाप भाग्यशाली !

धुमसतात अजूनि विझल्या चिंतांचे निखारे !
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
असावेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली !

====================
। गीतकार : सुरेश भट । 
। संगीतकार  : पं. हृदयनाथ मंगेशकर । 
। गायक : आशा भोसले, रवींद्र साठे । 
। चित्रपट : सिंहासन । 
====================


           (साभार आणि सौजन्य-कारवान क्लासिक रेडिओ शो-सारेगम मराठी)
             (संदर्भ-आठवले-आणि-साठवले.ब्लॉगस्पॉट.कॉम/यू-ट्यूब .कॉम)
         --------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.01.2022-मंगळवार.