"26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, January 26, 2022, 01:43:40 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "26 जानेवIरी - प्रजासत्ताक दिन"
                                             लेख क्रमांक-2
                                --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज बुधवार, दिनांक-२६ जानेवारी, २०२२ आहे. "आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा 'प्रजासत्ताक दिन' म्हणून मानला जातो. आपला  भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी आजच्या या ७५ व्या प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शभेच्छा, या सुमुहूर्तावर वाचूया, महत्त्वाची माहिती, लेख, इतिहास, भाषण, निबंध, शुभेच्छा, आणि बरंच काही.

        Republic Day 2021: काय आहे प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व?---

     २६ जानेवारी या दिवसाला खास महत्त्व आहे. हा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन. या दिवशी नवी दिल्लीत भव्य परेड पाहायला मिळते. संपूर्ण जगाला भारत आपली ताकद दाखवतो. देशभरात देखील अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.

     २६ जानेवारी या दिवसाला खास महत्त्व आहे. हा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन. या दिवशी नवी दिल्लीत भव्य परेड पाहायला मिळते. संपूर्ण जगाला भारत आपली ताकद दाखवतो. देशभरात देखील अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं.

     देशातील नागरिक वेगवेगळ्या प्रकारे आपली देशभक्ती व्यक्त करतात. या दिवसाला भारतात विशेष महत्त्व आहे. कारण या दिवशी भारत पूर्णपणे स्वातंत्र झाला होता. परंतू अनेकांना या दिवसाचं महत्त्व माहित नाही. पाहूयात काय आहे या दिवसाचे महत्त्व...

     २६ नोव्हेंबर १९४९ आणि २६ जानेवारी १९५० हे दोन दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. त्यानंतर दोनच महिन्यांत म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केली. त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. या घटनांची आठवण म्हणून देशात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रवास हा अत्यंत खडतर होता.

     स्वातंत्र्यांनंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम तब्बल २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस सुरू होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीने राज्यघटनेचा मसुदा तयार केला. हे संविधान २६ नोव्हेंबर १९४९ या दिवशी स्वीकृत करण्यात आले. देश १५ ऑगस्टला स्वतंत्र झाला असला तरी २६ जानेवारीपासून भारताचं लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरू झालं. भारत या दिवशी लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनला. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

                     भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन---

     भारतात पहिला प्रजासत्ताक दिन १९५० साली साजरा करण्यात आला होता. १९५० रोजी आपल्याला भारताचं संविधान आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या रुपात भारताचे प्रथम राष्ट्रपती मिळाले होते. भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनापासून विविध देशातील राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याचीही परंपरा सुरू झाली.


--बबन बन्सीधर
--------------


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
                  ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2022-बुधवार.