"26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"-भाषण क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, January 26, 2022, 02:01:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"
                                         भाषण क्रमांक-2
                               ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज बुधवार, दिनांक-२६ जानेवारी, २०२२ आहे. "आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा 'प्रजासत्ताक दिन' म्हणून मानला जातो. आपला  भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी आजच्या या ७५ व्या प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शभेच्छा, या सुमुहूर्तावर वाचूया, महत्त्वाची माहिती, लेख, इतिहास, भाषण, निबंध, शुभेच्छा, आणि बरंच काही.

     ज्या दिवशी आपल्या भारत देशामध्ये संविधान लागू करून आपल्या भारत देशा बद्दल जनताचे शासन ही प्रणाली अस्तित्वात आली तो दिवस म्हणजे 26 जानेवारी म्हणून या दिवसाला प्रजासत्ताक दिवस देखील म्हटले जाते.

--"नसे फ़क्त पुस्तक, हा भारतीय धर्मग्रंथच !
समृद्ध संविधान बनले देशाचे सुज्ञ पालक,
गुलामगिरी संपली, झाले गणराज्य !
सत्ताधारी बनले चालक जनता झाली मालक."

     इंग्रजांच्या गुलामगिरीच्या राजवटी खाली अडकलेला व्यक्ती 26 जानेवारी या दिवशी खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊन देशाचा मालक झाला. 26 जानेवारी म्हणजे तो दिवस ज्या दिवशी भारताला समृद्ध, पवित्र असे सविधान मिळाले. आज आपल्या देशामध्ये जे काही घडत आहेत ते केवळ संविधानामुळेच. आपल्या देशाची प्रजासत्ताक झाली. सविधाना मार्फत आपल्या देशाची सर्वात मोठी लोकशाही अवतरली व आपल्या देशामध्ये लोकशाही प्रणाली अस्तित्वात आली.

     लोकशाही म्हणजे, "लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी लोकांकडून चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही होय."

--"रक्ताने लिहिला आहे,
भारत देशाचा इतिहास...
हसत-हसत स्वीकारले आहे,
कित्येकांनी मृत्यूचे ते फास...."

     आज आपण ज्या लोकशाही राजवटीखाली आहोत ते शक्य झाले ते केवळ थोर महान क्रांतीकारांचा बलिदानामुळेच. ज्या ज्या क्रांती कारणे आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली आज सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने अशा क्रांतीकारांचा कोटी कोटी प्रणाम !

     15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वतंत्र मिळालेले असले. तरीही देशातले लोक सैरभैर झालेले होते. विभिन्न तुकड्यात देश विभागलेला होता. अश्या दिशाहीन व भरकटलेल्या देशाच स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक होती नियामावली. भारतीय म्हणुन पाळावयाचे नियम.

     आपला देश हा प्रजासत्ताक झाला आणि लोकशाही प्रणाली देखील आपल्या देशांमध्ये अस्तित्वात आली हे केवळ शक्य झाले ते म्हणजे संविधानामुळेच... भारतामध्ये सर्वाना शांततेत, सुखासमधानाने जागता यावे. स्वातंत्र्याचा आनंद घेत-घेत नांदता यावे. म्हणुन, संविधान निर्मितीचे महान कार्य सुरु झाले.

     म्हणून दरवर्षी आपण प्रजासत्ताक हा दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे "संविधान" आहे.

     भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताला प्रजासत्ताक करून देण्यामध्ये आणि भारताला समृद्ध करून देण्यामागे खूप महत्वाचा वाटा आहे.


--AUTHOR UNKNOWN
-------------------------


                         (साभार आणि सौजन्य-संदर्भ-खासमित्र.कॉम)
                        ----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2022-बुधवार.