"26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"-भाषण क्रमांक-4

Started by Atul Kaviraje, January 26, 2022, 02:05:14 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   "26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"
                                            भाषण क्रमांक-4
                                 --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज बुधवार, दिनांक-२६ जानेवारी, २०२२ आहे. "आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा 'प्रजासत्ताक दिन' म्हणून मानला जातो. आपला  भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी आजच्या या ७५ व्या प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शभेच्छा, या सुमुहूर्तावर वाचूया, महत्त्वाची माहिती, लेख, इतिहास, भाषण, निबंध, शुभेच्छा, आणि बरंच काही.

                       26 जानेवारी भाषण---

     तुम्हाला येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाला भाषणात सहभागी होयचे तर इथे खास 26 January speech in Marathi 2021 दिलेले आहे. ज्याचा उपयोग करुण तुम्ही २६ जानेवारी ला भाषण समारंभात सहभागी होऊ शकता.

     सव्विस जानेवारी 1950 या दिवसी भारतीय संविधानाला लागु करण्यात आले होते. तेव्हापासून आपण republic day म्हणुन साजरे करतो. त्यानिम्मित विविध शाळेत वकृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले असते. म्हनुनच या post मध्ये विद्यार्थी मित्रांसाठी गणराज्य प्रजासत्ताक दिन भाषण दिलेले आहेत.

                        सव्वीस जानेवारी भाषण---

     आजच्या कार्यक्रमाचे सन्मानीय अधक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरजन वर्ग आणि स्वतंत्र प्रजासत्ताक देशाचे सुजान देशवासी असलेले बंधू आणि भगिनींनो

     आज प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा, उत्साहचा, सन्मानाचा अणि अभिमानाचा दिवस आहे.आज आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन. म्हणजेच संविधान लागु केल्याचा दिवस.

--"नसे फ़क्त पुस्तक, हा भारतीय धर्मग्रंथच !
समृद्ध संविधान बनले देशाचे सुज्ञ पालक,
गुलामगिरी संपली, झाले गणराज्य !
सत्ताधारी बनले चालक जनता झाली मालक."

     प्रजासत्ताक दिवस म्हणजे तो दिवस, ज्या दिवासी गुलामगिरीत खितपत पडलेला प्रत्येक भारतीय या देशाचा मालक झाला. तो दिवस ज्या दिवासी प्रत्येक भारतीयाला पवित्र आणि समृद्ध असे संविधान मिळाले, भारतीयच्या हातात सत्ता आली.देशाची प्रजा सत्ताक बनली. आपल्या देशात सर्वात मोठी लोकशाही अवतरली. भारतदेश हा एक लोकशाहीप्रणित गणराज्य बनले.

     लोकांचे, लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले जनतेचे राज्य म्हणजे गणराज्य.

     आज आपण जे गणराज्य अनुभवत आहोत. त्याचा निर्मितीसाठी ज्या-ज्या क्रांतिकारकांनि आपल्या प्राणाचे बलिदान दिले. अशा थोर व्यक्तिना कोटि-कोटि प्रणाम.

     15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वतंत्र मिळालेले असले. तरीही देशातले लोक सैरभैर झालेले होते. विभिन्न तुकड्यात देश विभागलेला होता. अश्या दिशाहीन व भरकटलेल्या देशाच स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक होती नियामावली. भारतीय म्हणुन पाळावयाचे नियम.


--ऋषिकेश  सोनावणे
-------------------


                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-जIनकारीबुक.कॉम)
                     --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2022-बुधवार.