"26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"-भाषण क्रमांक-6

Started by Atul Kaviraje, January 26, 2022, 02:09:02 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  "26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"
                                            भाषण क्रमांक-6
                                --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज बुधवार, दिनांक-२६ जानेवारी, २०२२ आहे. "आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा 'प्रजासत्ताक दिन' म्हणून मानला जातो. आपला  भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी आजच्या या ७५ व्या प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शभेच्छा, या सुमुहूर्तावर वाचूया, महत्त्वाची माहिती, लेख, इतिहास, भाषण, निबंध, शुभेच्छा, आणि बरंच काही.

              26 जानेवारी भाषण 2022 – प्रजासत्ताक दिन---

     सर्वप्रथम भारतीय राष्ट्रध्वजाला आदराने सलाम करतो  व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यानां मानाचा मुजरा.

     व्यासपिठावर उपस्थित मान्यवर, शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिनिनो तुम्हाला सर्व प्रथम 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस आपल्यासाठी का महत्वाचा व विशेष आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तरीही मी सांगू इच्छितो आज प्रजासत्ताक दिन अणि या गौरव शाली दिवसा बद्दल मला काही दोन शब्द व्यक्त करायचे तरी तुम्ही शांत बसाल ही नम्र विनंती.

     विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ब्रिटिश राजवटी पासुन तब्बल १५० वर्षा नंतर मुक्ति मिळाली. पण हे स्वातंत्र मिळवण्याकरता अनेक क्रातिकारणांना आपले प्राण गमवावे लागले. आणि त्या थोरपुरुषांनी कधीही आपल्या प्राणांची पर्वा केली नाही. ते सतत आपला मृत्यू तलवारीच्या धारे वर धरून ब्रिटिशाविरोधात संघर्ष करत होते. कारण त्यांला माहिती होते कि आपल्या येणाऱ्या पिढीला स्वातंत्र्याचा श्वास घेऊ देयचा असेल तर ह्या इंग्रजाच्या ताब्यातला भारत मुक्त केलाच पाहिजे.

     भारताच्या स्वातंत्र्या साठी अनेक क्रातींकारी रणांगणात उतरले व ब्रिटिशांच्या विरोधात बंड पुकारू लागले. यात भगत सिंह, राजगुरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या नेत्याचा समावेश होता. व या सारख्या लोकांच्या अथक परिश्रमानंतर भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र मिळाले.

     अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र मिळाले तर खरे. पण  तेव्हा समोर प्रश्न होता. कि आपला देशाचा राज्यकारभार कोणत्या पद्धतीने चालवायचा? देशातील प्रजेला  कोणती कर्तव्ये व अधिकार असावी याचे मूलभूत नियम करणे आवश्यक होते. यासाठी देशातील जेष्ठ नेत्यांनी राज्यघटना निर्मिती साठी समिती नेमण्यात आली. या समितीत डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, श्याम प्रसाद मुखर्जी, सरदार वल्लभ भाई पटेल या सारखे दिग्गज पुठारी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर डॉ. मुकुंद रामराव जयकर याच्यासरखे कायदा पंडित होते.

     स्वातंत्र मिळाल्यानंतर 14 दिवसांनी म्हणजेच 28 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली हि मसुदा समिती तयार करण्यात आली. ह्या समितीने एकत्रित बसून सगळी घटना पुस्तिका लिहिली. तब्बल 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवसात संविधान लिहिण्याचे कामकाज पूर्ण झाले. मसुदा समितीने संविधानाच्या हिंदी व इंग्रजी अशा दोन भाषेत हस्तलिखित प्रति काढल्या. व 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान लागु करण्यात आले

     संविधानाने आपल्याला गोपिनियता, शिक्षण, मतदान असे काही मुलभुत आधिकार दिले आहेत. एवढच नाही तर आपन भारताच्या कुठल्याही प्रांतात राहु शकतो, कुठल्याही धर्माला किंवा देवाला पुजु शकतो. असे बरेचसे आधिकार संविधानाने आपल्याला दिलेले आहेत. तसेच सत्तेवर असलेले सरकार कोणत्या नियमांच्या व कायद्याचा आधिकारावर सरकार चालवेल हे सुद्धा सविंधानाच्या आधारावर ठरलेले आहे.

     आणि एकंदरितच भारत देशाचा राज्यकारभार ज्या घटनेवर चालवला जातो. त्त्या संविधानामुळे देशातील प्रजेला आपला हक्क व अधिकार मिळाले. तो दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 आणि या दिवसा पासुनच आपण दरवर्षी सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरी करतो.

     एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद! जय भारत!


--ऋषिकेश  सोनावणे
-------------------


                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-जIनकारीबुक.कॉम)
                     --------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2022-बुधवार.