"26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"-निबंध क्रमांक-7-अ

Started by Atul Kaviraje, January 26, 2022, 02:37:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 "26 जानेवारी - प्रजासत्ताक दिन"
                                         निबंध क्रमांक-7-अ
                               --------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज बुधवार, दिनांक-२६ जानेवारी, २०२२ आहे. "आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा 'प्रजासत्ताक दिन' म्हणून मानला जातो. आपला  भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे." मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी आजच्या या ७५ व्या प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शभेच्छा, या सुमुहूर्तावर वाचूया, महत्त्वाची माहिती, लेख, इतिहास, भाषण, निबंध, शुभेच्छा, आणि बरंच काही.

                   प्रजासत्ताक दिनI वर मराठी निबंध---

    आपल्या सैन्याच्या तयारीची आपणास एक झलक पाहावयास मिळते. शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मनोरंजनाचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. नंतर वेगवेगळ्या राज्यांच्या आकर्षक शोभायात्रा निघतात. त्यातून राष्ट्रीय ऐक्य, संस्कृती, इतिहास आणि समृद्धीचे दर्शन घडते. प्रादेशिक लोकनृत्ये सादर केली जातात. हा सर्व कार्यक्रम मंत्रमुग्ध करणारा असतो. हजारो लोक हे सर्व पाहण्यासाठी आलेले असतात.

     इंटरनेट व दूरदर्शनवर त्याचे थेट प्रसारण केले जाते. रात्री सरकारी इमारतींवर विद्युत रोषणाई केली जाते. असे वाटते जणू दिवाळीच आहे.  राजधानी दिल्लीखेरीज इतर राज्यांच्या राजधान्या, शहरे, गावे सर्वत्र प्रजासत्ताकदिन धूमधडाक्याने साजरा केला जातो. प्रांतांच्या राजधान्यांत राज्यपाल परेडची सलामी घेतात. शाळा, कॉलेज, संस्था इ. ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केलेले असतात. सर्व सरकारी इमारतींवर तिरंगा फडकविण्यात येतो.

     या उत्साह व उत्सवाबरोबर हा दिवस आमच्या चिंतनाचा पण आहे. तो आपणास ही प्रेरणा देतो की आपण आपल्या भारताला अधिक सुदृढ, सुखी, समृद्ध आणि उन्नत बनविले पाहिजे. आपल्या स्वातंत्र्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागला पाहिजे. आपली त्याग आणि बलिदानाची परंपरा नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. खरोखरच हा एक अविस्मरणीय दिवस असतो. राष्ट्रीय उत्सव, मेळा असतो. ज्यात सर्व वर्ग जाती, धर्माचे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळे उत्साहाने भाग घेतात. त्यामुळे आपल्या राष्ट्रीय ऐक्य, भावनात्मकता, अखंडतेला बळ मिळते.

     भारतात इतरही अनेक उत्सव होतात पण २६ जानेवारी एकमेवच. परदेशांत भारतीयांखेरीज इतर परदेशी लोक पण हा कार्यक्रम आवडीने पाहतात. या प्रसंगी इतर राष्ट्रांचे प्रतिनिधी विशेष पाहुणे पण हजर असतात. ते आपल्याबरोबर या दिवसाच्या आठवणी घेऊन जातात.

     मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका.  धन्‍यवाद.


--AUTHOR UNKNOWN.
-------------------------


                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-एसे मराठी.कॉम)
                      -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2022-बुधवार.