II माघी गणेश जयंती II-लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, February 04, 2022, 12:07:11 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                      II माघी गणेश जयंती II
                                            लेख क्रमांक-3
                                     -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

          आज शुक्रवार,०४ फेब्रुवारी ,२०२२ . माघ शुद्ध चतुर्थी अर्थात माघ महिन्यातील श्रीगणेश जयंती. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना, या माघी गणेश जयंतीच्या मनापासून शुभेच्छा. त्या बाप्पाला नमन करून वाचूया, माघी गणेश जयंतीवर लेख, माहिती, पूजा विधी, कथा, शुभेच्छा, कविता आणि बरंच काही.

     भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाप्रमाणे अलिकडच्या काही वर्षांमध्ये माघी गणेशोत्सवही उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. आधी मंदिरांपुरता मर्यादीत असलेला माघी गणेशोत्सव आता सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर साजरा होऊ लागला आहे. ठाणे शहरातील नौपाडा भागात १९३१ मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आता महाराष्ट्रात १०० पेक्षा जास्त सार्वजनिक मंडळांच्या माध्यमातून माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. अनेक घरांमध्येही माघी गणेशोत्सव साजरा केला जातो.

            माघी गणेशोत्सव २०२१ मार्गदर्शक सूचना---

     माघी गणेशोत्सव मंडळांनी उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यासाठी स्थानिक प्रशासनाची लेखी परवानगी घ्यावी. मर्यादीत स्वरुपाचे मंडप उभारावे. घरात जास्तीत जास्त दोन फुटी आणि सार्वजनिक मंडळांच्या मंडपात जास्तीत जास्त चार फुटी गणेशमूर्ती आणावी. शक्यतो पर्यावरणपूरक धातूची अथवा शाडूची मूर्ती आणावी. गणपती विसर्जन शक्यतो कोविड प्रोटोकॉलचे पालन करत मंडपाच्या आवारात अथवा घरातल्या घरात करावे अथवा सार्वजनिक विसर्जनस्थळी कोविड प्रोटोकॉलचे पालन करत करावे.कोरोना संकटाचे भान ठेवून विसर्जनासाठी मिरवणुका टाळाव्या.

     ऑनलाइन दर्शन, फेसबुक लाइव्ह, यू ट्युब लाइव्ह, स्थानिक केबल टीव्हीवरुन दर्शन या पर्यायांचा वापर करावा. मंडपाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन घेणाऱ्यांसाठी कोविड प्रोटोकॉल लागू आहे.
भाविकांनी मास्क घालून आणि सोशल डिस्टंस राखून गणपतीचे दर्शन घ्यावे. मंडपात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे प्रत्येकवेळी थर्मल स्कॅनिंग करावे.

     नागरिकांनी मास्क आणि सोशल डिस्टंसचे पालन कायम करावे. कोरोना संकट टाळण्यासाठी आपल्या हाती असलेला हा सर्वात सोपा आणि व्यावहारिक उपाय आहे.
मंडपात प्रवेशाच्या ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करावी. नागरिकांनी सॅनिटायझरने हात स्वच्छ करुन मंडपात प्रवेश करावा.  मंडपात सांस्कृतिक कार्यक्रम करण्याऐवजी रक्तदान शिबिरांचे तसेच आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करावे. कोविड प्रोटोकॉलचे पालन करत शिबिरांचे आयोजन करावे.

          गणेशभक्तांनी माघी श्रीगणेश जयंती निमित्त काय करावे?---

सकाळी लवकर उठून आंघोळ आटपून घरातल्या देवांची मनोभावे पूजा करा. गणपतीला जास्वंदाची फुले आणि दुर्वा अर्पण करा.
अथर्वशीर्ष आणि गणपती स्तोत्र म्हणा. गणपतीचे आणखी काही श्लोक, स्तोत्र, मंत्र म्हणायला हरकत नाही.
राग, लोभ या दुर्गुणांचा त्याग करण्यासाठी संकल्प करा आणि त्यावर अंमल करा.
आपल्या हातून कळत नकळत झालेल्या सर्व चुकांसाठी गणपती समोर उभे राहून माफी मागा.
दानधर्म करावा, भुकेल्यांच्या अन्नपाण्याची सोय करावी.
रुग्णसेवा, दिव्यांगांची तसेच अडचणीत सापडलेल्यांची आणि ज्येष्ठांची सेवा करावी.
गणेशभक्तांनी माघी श्रीगणेश जयंती निमित्त काय टाळावे?
कोणाशी वाद घालू नये, हाणामारी टाळावी.
अपशब्दांचा वापर टाळावा. कोणालाही दुखवू नये.
प्राणी आणि पक्षी यांना दुखवू नये.


--AUTHOR UNKNOWN
-------------------------


                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-टाइम्स नाऊ मराठी.कॉम)
                --------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.02.2022-शुक्रवार.