निवडणूक चारोळ्या-"फरक आहे फक्त एकामताचा,परिणाम होतोय आयुष्यात साऱ्याच गोष्टींचा"

Started by Atul Kaviraje, February 06, 2022, 01:57:55 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

 विषय : जिल्हा  बँक  निवडणुकीत  श्री .शशिकांत  शिंदे  यांचा  फक्त  एका  मताने  पराभव .
                      जिल्हा  बँका  निवडणूक  चारोळ्या
    "फरक आहे फक्त एका मताचा,परिणाम होतोय आयुष्यात साऱ्याच गोष्टींचा"
-------------------------------------------------------------------------


(1)
"जिल्हा  बँक"  निवडणुकीत  मतदान  केले  गेले  पदांसाठी
"जिल्हा  बँका"  कार्य  करिती  ग्रामीण ,खेडेगावी  ग्रामस्थांच्या  विकासासाठी
निवडणुकीत  कोणी  जिंकतो , तर  कोणी  हरतो ,
पण  फक्त  एका  "मताच्या"  अंतराने , खूपच  फरक  पडतो .

(2)
श्री .शशिकांत  शिंदेच्या  बाबतीत  असेच  घडले , अभावितपणे
फक्त  एक  "मताच्या"  आधिक्याने , प्रतिस्पर्ध्याची  झाली  जीत ,पूर्णपणे
एक  "मत"  कमी  पडले , शशिकांत  शिंदेंचे  भविष्य  घडण्या ,
"जिल्हा  बँकेत"  उच्च  पदावर  नियुक्ती  होण्या , वरिष्ठ -पद  मिळण्या .

(3)
जीवन  माणसाचे  आहे  असेच,  जय  पराजयाचे,  जीत आणि हार
कधी  कोणाची  होते  सरशी , तर  कधी  कोणा लागते  पत्करावी माघार
स्पर्धा  तर  रोजच्याच  आहेत  इथे , पावलांपावलांवर ,
आयुष्य  रंग  बदलतेय  इथे , प्रत्येक  वळणांवळणांवर .

(4)
विचारा  त्या  मुलांना , ज्यांची  उत्तीर्णता  एका  मार्काने  हूकलीय
विचारा  त्या  धावपटूंना , ज्यांचा  विजय  एका  सेकंदाने  पाठी  पडलाय
जन्म होणाऱ्या  बाळाची  कुंडली , एका  सेकंदाच्या  फरकाने  पूर्णपणे  बदलतेय ,
जीवनात  फार  महत्त्व  आहे , या  एकाच्या  आकड्याला .

(5)
शशिकांत  शिंदेंचे  हक्क ,मान -मरातब ,प्रतिष्ठा  आज  प्रतिस्पर्ध्याला  मिळालेत
उच्चपदी  बँकेत  प्रतिस्पर्ध्याची  वर्णी  लागून , त्यांचे  स्थान  पक्के  झालेय
आज  त्या  जागी  एका  "मताच्या"  फरकाने , शिंदे  विराजमान  असते ,
परंतु  नशिबाच्या ,नियतीच्या  पुढे  कोणाचेही  काहीही  चालत  नसते .

(6)
निराश  नाही  होणे  जीवनी , मानवा  तू  सोड  हा  अविचार
मात  करून  या  संकटावर , यापुढेही  जायचेय  तुला  फार -फार
पुढील  बँकांच्या  निवडणुकीत , श्री .शशिकांत  शिंदे  याना  माझ्या  शुभेच्छा ,
भरघोस  "मताने"  ते  होतील  विजयी , पूर्ण  होतील  त्यांच्या  साऱ्या  इच्छा .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.02.2022-रविवार.