चारोळ्या-"उर्वशी रदादीयानी लावलाय दैवी सूर,रसिकांच्या मनातून वाहतोय भक्तीचा पूर"

Started by Atul Kaviraje, February 08, 2022, 01:25:24 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

     विषय :गुजरात  मधील  प्रसिद्ध  लोक-गायिका  श्रीमती  उर्वशी  रदादीया , यांची  "काठियावाडची   कोकिळा ", अशी  ओळख  आहे . एका  गायन  कार्यक्रमात  त्यांच्या  श्रीमंत  भाविकांनी , रसिकांनी   त्यांच्यावर  बादलीतून  पैश्यांचा , नोटांचा  अभिषेक  केला .
           गुजरात  गान-कोकिळा  उर्वशी  रदादीया ,लोक-गायिका-चारोळ्या .
     "उर्वशी रदादीयानी लावलाय दैवी सूर,रसिकांच्या मनातून वाहतोय भक्तीचा पूर"
--------------------------------------------------------------------------


(1)
"काठियावाडची  कोकिळा" , "उर्वशी   रदादीया" आहेत  गुजरातेत  प्रसिद्ध
लाभलाय  त्यांना  दैवी  गळा , प्रत्यक्ष  सरस्वतीचं  झालीय  त्यांना  सिद्ध
रसिक  डोलताहेत  गाण्यांवर , विसरुनी  तहान -भूक  होऊनी  मंत्र -मुग्ध ,
गंधर्व  प्रत्यक्ष  पाहताहेत  स्वर्गातून , तेही  झालेत  आज  हत-बुद्ध .

(2)
"गान -कोकिळा"  लाभलीय  गुजरातला , तिच्या  स्वरांत  आहे  जादू
सरस्वतीचे  रूपच  वीणाधारी ,जन  लागलेत  तिज  पुजू  आणि  वंदू
रसिकांच्या  मनात  ती  इतकी  उतरलीय , श्रोत्यांचे  भानच  हरपलंय ,
सप्त -सुरांत , भक्ती -रसात  न्हाऊ  घालून  त्यांना , तिने  आपलेसे  केलंय .

(3)
गुजरात  व्यापारी -धंदा , उद्योगपती , कारखानदारांचे  माहेर -घरचं
पैसा  खुळखुळतोय  धनिकांच्या  खिशात , अपरंपार  अगणित  संपत्तीचं
धनिक -बाळे  काही  आहेत  शिष्य , "उर्वशीताईंच्या"  गायनाचे  आहेत  रसिक ,
नित्य  न  चुकता  वारी  लाविती , कार्यक्रमास  "उर्वशीताईंच्या"  नेहमीच .

(4)
त्यादिवशी  एक  आश्चर्यच  मिळाले  पहावया , "उर्वशी -ताईंनीही"  प्रथमच  अनुभवले
या धनिक -बाळांनी  त्यांच्या गायनास  दाद म्हणून , त्यांच्यावर  पैसे  की  हो  उडविले  !
इतकेच  करून  ते  नाही  थांबले , पुढचे  ऐका  तुम्ही  सज्जन  भले ,
पैश्यांच्या भरलेल्या बादलीने त्यांनी, "उर्वशीताईंच्या"  डोईवर  अभिषेक  की  हो  केले  !

(5)
काहीतरी ,कुठेतरी  चुकत  होते  हे  प्रकर्षाने  जाणवत  होते , यात
पैश्यांची  ही  उधळण ,मुक्त  पखरण ,का  होत  होती  त्यांच्या  गायनात  ?
दृश्य  हे  अस्वस्थ  करून  गेले , काहीतरी  वेगळंच  सांगून  गेले ,
प्रतिष्ठा  पाहता  "उर्वशी -ताईंची" , असे  घडावयास  नको  होते , पण  घडले .

(6)
पैश्यांची  उधळण ,ही  फेक ,ही  उधळ -पट्टी , या  धनिक -बाळांनी  थांबवावी
देणगीच्या  रूपातही  त्यांना  ते  "उर्वशी -ताई"  मंडळाला  देता  आले  असते
नको पैश्यांचा असा अपमान , तेव्हा  त्या  स्टेजवर,  पसरलेल्या  अवस्थेत , अस्ताव्यस्त ,
अभिनव उपक्रम राबविता येतील , समाज -हिताचे ,समाजोपयोगी  आदर्श  अन  स्तुत्य .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.02.2022-मंगळवार.