"ट्रेनचा डबा खवय्यांची वाट पहातोय,उत्तमोत्तम खाद्य-पदार्थ्यांच्या डिशेश पुरवतोय"

Started by Atul Kaviraje, February 11, 2022, 01:26:19 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                 विषय : रेल्वेच्या  जुन्या  डब्यात  रेस्टॉरंट  उघडले
                     वास्तव , रेल्वे -आधुनिकीकरण  चारोळ्या
  "ट्रेनचा डबा खवय्यांची वाट पहातोय,उत्तमोत्तम खाद्य-पदार्थ्यांच्या डिशेश पुरवतोय"
                                     (भाग-१)
------------------------------------------------------------------------


(1)
जुना  झाला  म्हणून  का  यार्डात  फेकायचा  ?
सेवा  देत  होता  तो  आयुष्यभर  "रेल्वेला"
कुणातरी  कल्पकाचे  हात  लागलेत  त्याला ,
वेळ  नाही , आता  त्याचे  "हॉटेलात"  रूपांतर  व्हायला !

(2)
आज  त्याची  किंमत  ओळखलीय  कुणीतरी
जुने  ते  नेहमीच  असते  सोने
नवे  रूप  लेऊन  सज्ज  झालाय  "रेल्वेचा"  तो  "डबा" ,
आपल्या  पहिल्या  (CUSTOMER) "खवय्याची"  आतुरतेने  वाट  पाहायला .

(3)
काल  "रेल्वेचा"  तो  "डबा"  प्रवाश्यानी  भरलेला  होता
सुखरूप  त्यांना  गंतव्य -स्थळी  पोहोचवीत  होता
आजही  तो  त्यांच्या  पोटाचीच  काळजी  घेतोय ,
"हॉटेलचे"  रूप  लेऊन  त्यांना  आपुलकीने  भरवतोय .

(4)
"रेल्वेचा"  तो  "डबा" , आजही  काम  करतोय
म्हातारपणीही  आपले सर्वस्व देऊन  अनुदानात  भर  पाडतोय
तरुणपणीचे , त्याला  त्याचे  ते  दिवस  आठवताहेत ,
आजही  तो  या  वयात , सेवादानं  करून  कृत -कृत्य  होतोय .

(5)
प्रवाश्यांचे  "रेल्वे"  गाडीवर  अजुनी  प्रेम  आहे
आयुष्यभर  प्रवास  करून  त्यांची  पाऊले  थकली  आहेत
त्या  जुन्या  आठवणी  आठवत , "जुन्या  डब्याबरोबरच्या"
आजही  त्यांची  पाऊले  त्याच्याकडेच  वळत  आहेत .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.02.2022-शुक्रवार.