"१२-फेब्रुवारी –दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, February 12, 2022, 08:25:16 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१२.०२.२०२२-शनिवार.जाणून घेऊया,आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                      "१२-फेब्रुवारी –दिनविशेष"
                                     ------------------------


अ) १२ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना.
   ------------------------------

१५०२: लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसर्‍या सफरीवर निघाला.

१९७६: पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.

१९९३: एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

२००३: आवाजापेक्षा दुप्पट वेगवान ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

=========================================

ब) १२ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म.
   ---------------------------

१७४२: बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १८००)

१८०४: जर्मन भौतिकशास्त्रज हेन्‍रिक लेन्झ यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १८६५)

१८०९: उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १८८२)

१८०९: अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा जन्म. (मृत्यू: १५ एप्रिल १८६५)

१८२४: संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १८८३ – अजमेर, राजस्थान)

१८७१: इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९४०)

१८७६: १३ वे दलाई लामा थुब्तेन ग्यात्सो यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९३३)

१८७७: फ्रेंच व्यापारी रेनॉल्ट कंपनीचे संस्थापक लुई रेनॉल्ट यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९४४)

१८८१: द डाइंग स्वान म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना अ‍ॅना पाव्हलोव्हा यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १९३१)

१९२०: चित्रपट अभिनेता प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ प्राण यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै २०१३)

१९४९: शैलीदार फलंदाज गुन्डाप्पा विश्वनाथ यांचा जन्म.

=========================================

क) १२ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------------

१७९४: पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन.

१८०४: जर्मन तत्त्ववेत्ता एमॅन्युएल कांट यांचे निधन. (जन्म: २२ एप्रिल १७२४)

१९९८: कवयित्री पद्मा गोळे यांचे निधन. (जन्म: १० जुलै १९१३)

२०००: सहकार क्षेत्रातील नामवंत नेते विष्णुअण्णा पाटील यांचे निधन.

२००१: अभिनेत्री भक्ती बर्वे यांचे निधन. (जन्म: १० सप्टेंबर १९४८)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.02.2022-शनिवार.