बालभारती - आठवणीतील कविता

Started by MK ADMIN, February 15, 2009, 08:21:32 PM

Previous topic - Next topic

डॉ. जनार्दन पाटील

झाडाखाली बघुनी सावली बसतो चांभार | ठाऊक मजला आहे त्याचा सर्व कारभार ||
आरी घेऊन देई शिवुनी जोडे तुटलेले | टाच सांधणे नाल जोडणे सर्वकाळ चाले ||
रापी याची लखलख करीत चराचरा चाले | धूर विडीचा मधून केव्हा खुशालीत बोले ||
वेळ मिळीतो शिवीत राही  नवा बूट काही | विकेल तेव्हा मिळेल पैसा मनात हर्ष आहे||
पोचे येउन जुने झाले डबके पाण्याचे | तेच परंतू सोबत करते प्रामाणिक कसे ||
केस पांढरे जरी जाहले हाथ चालतात | तुटलेले पायतान कोणाचे नेत्र शोधतात ||
धंदा याचा पायतानाचा जरी | नवे पायतान कधी न घातले याने पायात ||

Rajesh Pullarwar

शर आला तो, धावुनि आला काळ
विव्हळला श्रावणबाळ
हा! आई गे! दीर्घ फोडुनि हाक
तो पडला जाऊन झोक.

ये राजाच्या श्रवणी करुणा वाणी
हृदयाचे झाले पाणी.
(चाल बदलून)
त्या ब्राह्मणपुत्रा बघुनि
शोकाकुल झाला नृमणी
आसवे आणूनी नयनी
तो वदला, हा हंत! तुझ्या नाशाला
मी पापी कारण बाळा.
मग कळवळुनि नृपास बोले बाळ
कशी तुम्ही साधली वेळ
मम म्हातारे मायबाप तान्हेले
तरुखाली असतील बसले
कावड त्यांची घेऊन मी काशीला
चाललो तीर्थयात्रेला
(चाल बदलून)
आणाया निर्मळ वारी
मी आलो या कासारी
ही लगभग भरुनि झारी
जो परत फिरे, तो तुमचा शर आला
या उरात रुतुनी बसला

मी एकुलता पुत्र, कसा हा घाला
मजवरती अवचित आला
त्यां वृद्धपणी मीच एक आधार
सेवेस आता मुकणार
जा, बघतील ते वाट पाखरावाणी
द्या नेऊन आधी पाणी.
(चाल बदलून)
आहेत अंध ते दोन्ही
दुर्वार्ता फोडू नका ही
ही विनती तुमच्या पायी
मजमाघारी करा तुम्ही सांभाळ
होऊनिया श्रावणबाळ.

परि झाकुनी हे सत्य कसे राहील?
विधिलेख न होई फोल
काळीज त्यांचे फाटुन शोकावेगे
ते येतील माझ्यामागे,
घ्या झारी ... मी जातो .. त्याचा बोल
लागला जावया खोल
(चाल बदलून)
सोडिला श्वास शेवटला
तो जीवविहग फडफडला
तनुपंजर सोडुनि गेला
दशरथ राजा, रडला धायी धायी
अडखळला ठायी ठायी.
[/size]

sevirkar


vinod.patil.12177276

"सुरवंटराव" आणी "गाऊ त्यांना आरती" ह्या कविता आहेत का कुणाकडे?

Madhavi27

Ugavalaa Narayan, aadhi aalaa maazya daari hee kavita aahe kaa ?

Çhèx Thakare


dipak chandane

marathi kavita mhatl ki he man tya shbdanchya jalyat guntun jat...........aani mag tyala kahich klat nahi..........................aas ka hvav yach utar hi milat nahi......................ankhi barch kahi vatate pan te aata mazya manat aahe...........................

mohan mahajan


Really enjoyed reading   all Kavita
I am looking for one Kavita,it was in balbharti-std 9 or 10th (marathi medium) I remember second line " je asur je asadhya tethe man dhave"
If any one remember this Kavita pl let me know first line or whole Kavita
sahaj mile tyat jiv truptata na pawe je dur je asadhya tethe man dhave. bahutek sanjeevani marathe yanchi kavita ahe hi.

mohan mahajan

मला वाटते बसुनी विमानी आकाशातून हिंडावे

किंवा सुंदर नौकेमधूनी समुद्रातूनी भटकावे

निळा निळा तो समोर डोंगर चढुनी वरती पहावे

राज्य तयांचे जाऊनी तेथे राज्य पदाते  मिळवावे

परी भूमीवर संध्याकाळी छायाकळी जो धावे

तेव्हा वाटे सोडुनी सकळा निज मातेला बिलगावे

मला पहिलीला (१९६८) ही कविता होती. कवी आठवत नाही. कोणाला माहित असल्यास कळवा.

bal kamble