बालभारती - आठवणीतील कविता

Started by MK ADMIN, February 15, 2009, 08:21:32 PM

Previous topic - Next topic

MK ADMIN

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीतारघुत्तमाची
रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
शीर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

येथे नको निराशा, थोडया पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जन शासनातळीचा पायाच सत्य आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

गीतकार :ग. दि. माडगुळकर

MK ADMIN

आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनाऱ्याकडे

मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती

तुफान केंव्हा भांडत येते सागर ही गर्जतो
त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

संथ सावळी दिसती जेंव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

क्षितिजावर मी कधी पाहतो मावळणारा रवी,
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

-कुसुमाग्रज

MK ADMIN

हन्स व नळराजा


न सोडी हा ऩळ भूमि पाळ माते...।
असे जाणोनी हन्स वदे त्याते....।।
हन्स हिन्सा नच घडो तुझ्या हाते..।
सोड राया जाईन स्वस्थळाते...।। 1।।

जाग जागी आहेत वीर कोटी..।
भले झुन्जारही शक्ति जया मोठी....।।
तया माराया धैर्य धरी पोटी..।
पाखरू हे मारणे बुद्धि खोटी....।।2।।.।

वधुनि माझी हे कनक रूप काया..।
कटक मुकुटादिक भूषणे कराया..।.
कशी आशा उपजली तुला राया..।
काय नाही तूजला दया माया...।।3।।

म्हातारी उडता न येचि तिजला, माता मदिया अशी।।
कान्ता काय वदू नव प्रसवती, साता दिसाची तशी ।।
पाता त्या उभयास मी मज विधी घातास योजितसे..।।
हातासाजी न्रुपा तुझ्या गवसलो. आता करावे कसे....।।4।।

सदय ह्रदय याचे भूप हा ताप हारी,।।
म्हणुनी परिसता मी होय येथे विहारी..।।
मजही वध कराया पातकी पातला जो..।.।
वरूनि पति असा ही भूमि कैसी न लाजो..।।5।।

येणे परी परिसता अती दीन वाचा..।।
हेलावला नळ पयोधि दया रसाचा.।।
सोडी म्हणे, विहर जा अथवा फिराया..।।
राहे यथा निज मनोरथ हन्स राया..।।6।।

सुटुनि खग पळाला, बैसला शाल शाखे..।
क्षणभरि निज देही मुक्ति विश्रान्ति चाखे..।।
स्वजन तव तयाचे भोवताली मिळाले...।
कवळिती निज बन्धु बाष्प बिन्दु गळाले...।।7।।

निसावा घे काही, उडुनि लवलाही परतला...।
न्रुपाळाच्या स्कन्धि बसुनि मणिबन्धि उतरला...।।
म्हणे हन्स, क्षोणी पतिस तुज कोणी सम नसे...।
दयेचा हा ठेवा तुज जवळी देवा वसतसे...।।8।।

ऐक राया तू थोर दया सिन्धु..।..
नीति सागरही तूचि दीन बन्धु..।।
निखन्दोनी बोलिलो नको निन्दु....।।
तुझे ऐसे उपकार जया वन्दु....।।9।।

हन्स मिळणे हे कठिण मयी लोकी...।
सोनियाचा तो नवल हे विलोकी..।।
तशा मजलाही सोडिले तुवा की..।
तुझा ऐसा उपकार मी न झाकी...।।10।।

किति रावे असतील तुझ्या धामी...।
किति कोकिळ ही सारिका तसा मी..।।
चित्त लागियले तूझिया लगामी...।।
न्रुपा योजी मज आपुलिया धामी...।।11।.

हे पाखरू मजसी येईल काय कामा...।
ऐसे न्रुपा न वद पूरित लोक कामा..।।
मोले उणे व्यजन ते धरिता पुढारी...।
छाया करी तपन दीप्तिस ही निवारी......

(कवी माहीत नाही)

MK ADMIN

अरे खोप्यामधी खोपा

अरे खोप्यामधी खोपा
सुगरनीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला..

पिलं निजले खोप्यात
जसा झूलता बंगला
तिचा पिलामधि जीव
जीव झाडाले टांगला..!

सुगरिन सुगरिन
अशी माझी रे चतुर
तिले जल्माचा सांगाती
मिये गन्यागम्प्या नर

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा !

तिची उलूशीच चोच,
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं ?

- बहीणाबाई चौधरी

MK ADMIN

पिपांत मेले ओल्या उंदिर;
माना पडल्या, मुरगळल्याविण;
ओठांवरती ओठ मिळाले;
माना पडल्या, आसक्तीविण.
गरिब बिचारे बिळांत जगले,
पिपांत मेले उचकी देउन;
दिवस सांडला घाऱ्या डोळीं
गात्रलिंग अन धुऊन घेउन.

जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.

उदासतेला जहरी डोळे,
काचेचे पण;
मधाळ पोळें
ओठांवरती जमलें तेंही
बेकलाइटी, बेकलाइटी!
ओठांवरती ओठ लागले;
पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!

- बा.सी.मर्ढेकर

MK ADMIN

आजीचे घड्याळ

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते

"अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,"
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
"बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !"

ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्त कधी लागता !
"आली ओटिवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले !
जा जा लौकर !" कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.

खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले, "खेळ पुरे, घरांत परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
"अर्धी रात्र कि रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !'
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा

सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !

- केशवकुमार

MK ADMIN

मी फुल तृनातील इवले

जरी तुझीया सामर्थ्याने
ढल्तील दीशाही दाही
मी फुल तृनातील इवले
उम्ल्नार तरीही नाही.

शक्तीने तुझीया दीपुनी
तुज करतील सारे मुजरे
पण सांग कसे उम्लावे
ओठातील गाणे हसरे?

जीन्कील मला द्व्बींदु
जीन्कील तृनाचे पाते
अन स्वताला वीसरून वारा
जोडील रेशमी नाते


कुर्वालीत येतील मजला
श्राव्नात्ल्या जलधारा
स्ल्स्लुन भीज्ली पाने
मज करतील सजल इशारे

रे तुझीया सामर्थ्याने
मी कसे मला वीस्रावे?
अन रंगांचे गंधांचे
मी गीत कसे गुन्फावे?

येशील का संग पहाटे
कीर्नांच्या छेडीत तारा;
उधलीत स्वरातुनी भवती
हलू सोनेरी अभीसारा?

शोधीत धुक्यातुनी मजला
द्व्बींदु होउनी ये तू
कधी भीजलेल्या मातीचा
मृदु सजल सुगंधीत हेतू!

तू तुलाच वीस्रून यावे
मी तुझ्यात मज वीस्रावे
तू हस्त मला फुलवावे
मी नकलत आनी फुलावे

पण तुझीया सामर्थ्याने
ढल्तील दीशा जरी दाही
मी फुल तृनातील इवले
उम्ल्नार तरीही नाही

(मंगेश पाडगावकर )

MK ADMIN

नीवडून्गाच्या शीर्ण फुलाचे

नीवडून्गाच्या शीर्ण फुलाचे
झुबे लालसर ल्यावे कानी ;
जरा शीरावे पदर खोचुनी
करवंदीच्या जाळीमधुनी.

शीळ खोल ये तळरानातून
भणभण वारा चढ़णीवरचा;
गालापाशी झील्मील लाडीक
स्वाद जीभेवर आंबट कच्चा.

नव्हती जाणीव आणी कुणाची
नव्हते स्वप्नही कुणी असावे;
डोंगर चढ़णीवर एकटे
कीती फीरावे... उभे रहावे.

पुन्हा कधी न का मिळायचे
ते माझेपण आपले आपण;
झुरते तन मन त्याच्यासाठी
उरते पदरी तीच आठवण ...

नीवडून्गाच्या लाल झुब्याची,
टपोर हिरव्या करवंदाची ...

- इंदीरा संत

MK ADMIN

ऐल तटावर पैल तटावर

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन

निळा सावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे;

शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे

पायवाट पांढरी तयांतुन अडवीतिडवी पडे;

हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहाकडे

झांकळुनी जड गोड काळिमा पसरी लाटांवर;

पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर

- बालकवी

MK ADMIN

एका तळ्यात होती बदके पिले सुरेख

एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख
होते कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक

कोणी न त्यास घेई, खेळावयास संगे
सर्वांहूनी निराळे ते वेगळे तरंगे
दावूनी बोट त्याला, म्हणती हसून लोक
आहे कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक

पिल्लास दुःख भारी, भोळे रडे स्वतःशी
भावंड ना विचारी, सांगेल ते कुणासी?
जे ते तयास टोची, दावी उगाच धाक
आहे कुरूप वेडे, पिल्लू तयांत एक

एके दिनी परंतु, पिल्लास त्या कळाले
भय वेड पार त्याचे, वाऱ्यासवे पळाले
पाण्यात पाह्ताना, चोरूनिया क्षणैक
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक

- ग. दि. माडगुळकर