II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II-लेख क्रमांक-3

Started by Atul Kaviraje, February 13, 2022, 03:12:23 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                           लेख क्रमांक-3
                                ------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. उद्याचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त लेख, यामागचा इतिहास, कथा, शुभेच्छा संदेश, प्रेम-चारोळ्या, प्रेम-मेसेज इत्यादी.

                 का साजरा केला जातो व्‍हॅलेंटाइन डे ?

     व्हॅलेंटाइन डे जसजसा जवळ येतो तसतसं तरूणाईमध्‍ये प्रेमाचा अंकुर फुलत जातो. या दिवशी प्रियकर आपल्‍या प्रेयसीसमोर प्रेम व्‍यक्‍त करतो. युवक हा दिवस प्रेमाचा दिवस म्‍हणून साजरा करतात. मात्र, व्‍हेलेंटाइन दिवस केव्‍हापासून आणि का साजरा केला जातोय ? याबाबतीत अनेक विसंगती आहेत.

     संत व्‍हेलेंटाइन यांना इसवी सन 270 च्‍या फेब्रुवारी महिन्‍याच्‍या मध्‍यास दफन करण्‍यात आले होते, असे काही ठिकाणी म्‍हटले जाते. त्‍यावेळी रोममध्‍ये सम्राट क्‍वॉलिडियसचे राज्‍य होते. लग्‍न केल्‍यामुळे पुरूषांची शक्‍ती आणि बुद्धी कमी होते, असे क्‍वॉलिडियसला वाटत असत. त्‍यामुळे त्‍याने कोणत्‍याही सैनिकाने आणि अधिका-याने लग्‍न करू नये असा मुलूखावेगळा नियम बनवला होता. संत व्हॅलेंटाइनने सम्राटाच्‍या या आदेशाला विरोध केला. तेव्‍हापासून त्‍याच्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ प्रेम दिवस म्‍हणजेच व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. प्राचीन रोममध्‍ये फेब्रुवारीला सफाई करण्‍याचा महिना देखील म्‍हणतात. तेथील लोक यावेळी घराची रंगरंगोटी करतात.

     काही इतर दंतकथांप्रमाणे रोमनच्‍या तुरूंगात कैद असलेल्‍या ख्रिश्‍चन लोकांचा छळ करण्‍यात येत होता. त्‍यांना तुरूंगातून पळण्‍यास व्हॅलेंटाइन यांनी मदत केली होती. त्‍यामुळे सम्राटाने त्‍यांना मारले, असे म्‍हटले जाते.

     तर काही ठिकाणी, व्हॅलेंटाइन स्‍वत: तुरूंगात होते. त्‍यावेळी व्हॅलेंटाइन आणि जेलरच्‍या मुलीबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले. जेलरची मुलगी रोज व्हॅलेंटाइन यांना भेटायला यायची. पहिल्‍यांदा व्हॅलेंटाइन यांनी स्‍वत:लाच व्हॅलेंटाइन ग्रिटिंग कार्ड पाठवले होते. त्‍या ग्रिटिंग्‍जच्‍या खाली 'तु माझी व्हॅलेंटाइन बनशील काय ? असे लिहिले होते. तेव्‍हापासून ही परंपरा अस्तिवात आली. त्‍यामुळे संत व्हॅलेंटाइन यांच्‍या स्‍मृतीनिमित्त आजही व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो.


--AUTHOR UNKNOWN
--------------------------


                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-दिव्यमराठी.भास्कर.कॉम)
                  ------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2022-रविवार.