II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II- प्रेम-चारोळ्या क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, February 13, 2022, 04:38:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                   II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                        प्रेम-चारोळ्या क्रमांक-2
                                 -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. उद्याचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त लेख, यामागचा इतिहास, कथा, शुभेच्छा संदेश, प्रेम-चारोळ्या, प्रेम-मेसेज इत्यादी.

6. पैज लावू मधू हरे
अन् शर्कराही लाजते
का तुझ्या ओठास
काळी मुंगी देखील चावते?

– संदीप खरे
-------------

7. तु प्रणयाची चाहूल
गुलाबी भूल
गुंतल्या नयनी दिसणारी की
अनुरागाची खूण
नजर चुकवून
लाज होऊन
उमटणारी ?

– गुरू ठाकूर
--------------

8. प्रेमाच्या प्रांतात स्वतःकडे कमीपण घेण्याची वृत्ती लागते
स्वतःला लहान समजण्यातलं मोठेपण मिळवायचं असतं

– व.पु.काळे,लेखक
-------------------

9. विस्तीर्ण नभाच्या खाली
धरती निजलेली शांत
मी अवघडले बावरले
तू घेता हाती हात

– स्पृहा जोशी, अभिनेत्री
-----------------------

10. काल रात्री
तुझ्या उघड्या पाठीवर
नखांनी लिहिलेली कविता..
मला तोंडपाठ करायची आहे!


– वैभव जोशी
-------------


                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                 ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2022-रविवार.