II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II-व्हॅलेंटाईन डे उखाणे

Started by Atul Kaviraje, February 13, 2022, 06:04:36 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                       व्हॅलेंटाईन डे उखाणे
                               -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     उद्या दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. उद्याचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त लेख, यामागचा इतिहास, कथा, शुभेच्छा संदेश, प्रेम-चारोळ्या, प्रेम-मेसेज इत्यादी.

                         व्हॅलेंटाईन डे स्पेशल उखाणे---


कोल्हापुरच्या देवीला सोन्याचा
साज
.....रावांच नाव घेते व्हॅलेंटाईन डे आहे आज.
==========================
घराच्या दाराला आंब्याच्या पानांचे
तोरण
......रावांचे नाव घ्यायला व्हॅलेंटाईन डे
कारण.
==========================
हिमालय पर्वतावर बर्फाच्या
राशी
.....रावांचे नाव घेते
व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी.
==========================
हातात घातल्या बांगड्या गळ्यात
घातली ठशी
......रावांचे नाव घेते व्हॅलेंटाईन डे च्या
दिवशी.
==========================
गुलाबाच्या फुलांपेक्षा
नाजूक
दिसते शेवंती
....... रावांनी सुखी राहावे ही
परमेश्वराला विनंती..
==========================


--AUTHOR UNKNOWN
-------------------------


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ-ऑल इन मराठी.कॉम)
                  -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.02.2022-रविवार.