II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II-चित्रपट गीत क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, February 14, 2022, 12:06:24 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस II
                                      चित्रपट गीत क्रमांक-2
                              -------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४ फेब्रुवारी, २०२२ - सोमवार आहे. आजचा दिवस, "व्हॅलेन्टाईन्स डे हा प्रेम दिवस म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात." तेव्हा चला तर वाचूया, प्रेम-दिना निमित्त मराठी चित्रपटातील काही प्रेम-गीते.

     'Mala Ved Lagale Premache', this amazing love song from 'Timepass', a teenage love story starred Ketaki Mategaonkar and Prathamesh Parab. It is about the rollercoaster of emotions Dagdu and Prajakta go through at the start of their first relationship. Sung by Ketaki Mategaonkar and Swapnil Bandodkar, the evergreen song has music directed by Chinar-Mahesh and lyrics by Guru Thakur.


                             मला वेड लागले प्रेमाचे

रंगबावऱ्या स्वप्नांनी सांगा रे सांगा
कुंदकळ्यांना वेलींनी सांगा रे सांगा
हे भास होती कसे हे नाव ओठी कुणाचे
का सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे प्रेमाचे

नादावला धुंदावला कधी गुंतला जीव बावळा
नकळे कसा कोणामुळे सूर लागला मनमोकळा
हा भास की तुझी आहे नशा
मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे प्रेमाचे

जगणे नवे वाटे मला कुणी भेटले माझे मला
खुलता कळी उमलून हा मनमोगरा गंधाळला
हा भास की तुझी आहे नशा
मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे
प्रेमाचे प्रेमाचे

===========================
मराठी चित्रपट-टाईमपास
कास्टिंग-केतकी  माटेगावकर  आणि  प्रथमेश  परब
गायक-केतकी  माटेगावकर  आणि स्वप्नील  बांदोडकर
गीतकार-गुरु ठाकूर
संगीतकार-चिनार -महेश
===========================


                         (साभार आणि सौजन्य-सॉंग लैरिसिस्ट.कॉम)
                      (संदर्भ-टाइम्स ऑफ इंडिया.इंडिया टाइम्स.कॉम)
                    ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.02.2022-सोमवार.